गोंदिया: 26 ला PM मोदी यांच्या हस्ते चुलोद रेल उड़ान पुलाच्या डिजिटल ऑनलाइन पद्धतीने शिलाण्यास..

1,422 Views    गोंदिया(ता.20) रेल्वे गाड्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे नागरिकांना तासंतास रेल्वे गेटवर थांबून राहावे लागत असते. त्यामूळे नागरिकांना खूप त्रास होऊन त्यांचा वेळ वाया जात असतो.हीच अडचण लक्षात घेऊन रेल्वे विभागाने “अमृत भारत” योजनेअंतर्गत गोंदिया तालुक्यातील चुलोद रेल्वे गेट वर उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतला असून येणाऱ्या सोमवारी (ता.26)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल ऑनलाइन पद्धतीने शिलाण्यास सोहळा होणार आहे. सदर कार्यक्रमाचे लाईव्ह आयोजन चुलोद रेल्वे गेट परिसरात करण्यात आले असून सदर कार्यक्रमास खासदार सुनिल मेंढे,आमदार विनोद अग्रवाल व इत्तर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने…

Read More

राज्य सरकार ठरले विघ्नहर्ता, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपयांची नुकसान भरपाई

1,311 Views  माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा.. भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,…

Read More

गोंदिया सह राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय शुरु करण्याच्या निर्णय

488 Views मुंबई। राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहे. या 6 शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे  13  कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल.             नंदुरबार व गोंदिया येथील…

Read More

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्या- डॉ फुके

223 Viewsगोंदिया/भंडारा (12 फेब्रुवारी) 10-11 फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन व शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी केली आहे.

Read More

आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करा-उपराष्ट्रपती जगदीप धनखड

505 Viewsगोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन       गोंदिया, दि.11 :  देशाच्या अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी तसेच  देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले.        येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूच्या भूमिपूजन समारंभात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, डॉ. सी.एम. रमेश, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री…

Read More