गोंदिया: 26 ला PM मोदी यांच्या हस्ते चुलोद रेल उड़ान पुलाच्या डिजिटल ऑनलाइन पद्धतीने शिलाण्यास..

1,586 Views

 

 

गोंदिया(ता.20) रेल्वे गाड्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे नागरिकांना तासंतास रेल्वे गेटवर थांबून राहावे लागत असते. त्यामूळे नागरिकांना खूप त्रास होऊन त्यांचा वेळ वाया जात असतो.हीच अडचण लक्षात घेऊन रेल्वे विभागाने “अमृत भारत” योजनेअंतर्गत गोंदिया तालुक्यातील चुलोद रेल्वे गेट वर उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतला असून येणाऱ्या सोमवारी (ता.26)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल ऑनलाइन पद्धतीने शिलाण्यास सोहळा होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे लाईव्ह आयोजन चुलोद रेल्वे गेट परिसरात करण्यात आले असून सदर कार्यक्रमास खासदार सुनिल मेंढे,आमदार विनोद अग्रवाल व इत्तर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रेल्वे विभाग व चुलोद ग्राम पंचायत प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.

मोदी शासनाच्या अमृत भारत योजनेअंतर्गत नागपूर विभागातील सात रेल्वे स्थानकांचा कायापालट तसेच चौसष्ठ रेल्वे गेटवर उड्डाणपूल (ROB)बांधण्यात येणार असुन यात चुलोद रेल्वे उड्डाण पूलाचा समावेश करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाचा शीलाण्यास सोहळा डिजिटल ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता.26) दुपारी बारा वाजता दरम्यान होणार असुन सदर शीलाण्यास सोहळ्याचे आयोजन थेट प्रक्षेपण पद्धतीने चुलोद रेल्वे गेट परिसरात करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंगळवारी (ता.20)येथील जिल्हा परिषद शाळेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी सरपंच माया बोरकर गोंदिया रेल्वे स्टेशन एडीएम अभय बोरकर, उपसरपंच लतीश बिसेन,ग्रामविकास अधिकारी लेंडे, मुख्याध्यापक एच.सी. पारधी, आर.एस.चव्हाण, ग्रा.पं.सदस्य विजय ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर उड्डाण पुलामुळे परिसरातील आसोली, मुंडीपार(खुर्द) नवरगाव(कला), नवरगाव (खुर्द) इररी, दत्तोरा, तसेच कामठा व कातूर्ल्ली परिसरातील जिल्हा मुख्यालयाला जाणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे.

सदर कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चुलोद ग्रामपंचायत प्रशासन व गोंदिया रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

Related posts