गोंदिया: शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुक करणाऱ्यास मुंबई येथून आमगाव पोलिसांनी केले जेरबंद…

909 Views
गोंदिया: शेअर बाजारातुन जास्त नफा मिळवुन देतो असे ऑनलाईन आमीष दाखवुन वेग-वेगळ्या फर्मच्या नावाने वेगवेगळ्या चालु बँक खाते उघडुन त्यावर लोकांकडुन रक्कम प्राप्त करुन लोकांची फसवणुक करणाऱ्यास आमगाव पोलिसांनी मुंबई येथुन ताब्यात घेतले आहे.
                 याबाबात सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार नामे- दिलीपकुमार अशोक मटाले, रा. मौजा-शिवणी, ता. आमगाव जि. गोंदिया यांची शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुक झाल्याचे दिलेल्या तकारी वरुन पोलीस स्टेशन- आमगाव येथे दिनांक २६/०६/२०२३ रोजी अप.क. २०५/२०२३ कलम ४२०,३४ भा.द.वि. सहकलम ६६ (क), ६६ (ड) माहीती तंत्रज्ञ अधिनियम २००० अन्वये गुन्हा नोंद असुनं पोलीस निरीक्षक युवराज हांडे हे तपासी अधिकारी आहे..
 गुन्हयातील आरोपी व पाहीजे असलेले संशयीत आरोपीचा शोध घेण्याकरीता पोलीस ठाणे आमगाव येथील पोलीस पथक मुंबई करिता रवाना करण्यात आले होते…
पोलीस पथक सपोनि गणपत धायगुडे, सपोउपनि शेंन्द्रे, व पोशि साबळे हे मुंबई येथे आरोपी चा शोध करीत असताना आरोपी हा वारंवार आपले मोबाईल क्रमांक बदलत असल्याने आरोपीचा शोध घेणे अवघड होत होते….
असे असतांना सुध्दा पोलीस पथकाने मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना मानवी कौशल्याचा वापर करुन व प्राप्त गोपनीय माहीती वरुन गुन्हयातील आरोपीचे तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची तांन्त्रीक माहितीचे विश्लेशन करुन शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त नफा मिळवुन देण्याचे आमीष दाखवुन वेग-वेगळ्या फर्मच्या नावाने वेग- वेगळ्या चालु बँक खाते उघडुन त्यावर लोकांकडुन रक्कम प्राप्त करुन लोकांची फसवणुक करणारा आरोपी नामे- कल्पेश सतिश मिश्रा, वय ३८ वर्ष, रा. सांताकृझ मुंबई यास त्याच्या राहते घरुन दिनांक १८/०२/२०२४ रोजी सांताकृझ पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाच्या मदतीने छापा टाकुन पहाटे ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले…
आरोपीस सदर गुन्हयात आज दिनांक- १९/०२/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली आहे. …सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे हे करीत आहे.
               सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री. निखील पिंगळे,  अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव, श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक युवराज हांडे, प्रभारी अधिकारी, गोंदिया यांच्या मार्गदर्शनात सपोनि गणपत धायगुडे,सपोउपनि शेंन्द्रे व पोशि साबळे यांनी केली आहे.

Related posts