जूनेवानी येथे राकाँपा पक्षाची बैठक संपन्न, उत्साही व सक्रिय कार्यकर्त्यांची बूथ कमिटी तयार करा – मा. आ. राजेंद्र जैन

130 Views

 

गोंदिया। आज ग्राम जुनेवानी (गंगाझरी) तालुका गोंदिया येथे जिल्हा परिषद क्षेत्र एकोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बूथ पदाधिकारी यांची माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत बोलतांना प्रत्येक बुथवर काम करेल अश्याच उत्साही व सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देऊन प्रत्येक बुथ निहाय्य सक्रिय व क्रियाशील कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात यावी असे बैठकीला मार्गदर्शन केले.

माजी आमदार श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले की, या परिसरातील शेतीला सिंचनाची सोय करण्यासाठी व शेतकरी शेतमजूर यांच्या हाताला काम मिळून प्रगती करीता खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नाने धापेवाडा प्रकल्पाचे खलबंदा जलाशयात पाणी आणण्यात आले. शेतकऱ्यांना बोनस, लाडकी बहीण योजना, मुलींना निःशुल्क उच्च शिक्षण, मोफत तीन सिलेंडर योजना, बळीराजा मोफत वीज योजना, युवा कार्य प्रशिक्षण हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनहितासाठी केलेल्या कामाचे प्रतीक आहे. आता वेळ आली आहे आपल्या क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विकासाच्या ध्येयासाठी आपली ताकद खा. श्री प्रफुल पटेलजी यांच्या मागे उभी करण्याची आहे.

यावेळी प्रामुख्याने सर्वश्री राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, राजेश कटरे, अश्विनी पटले, प्रकाश पटले, रवीकुमार पटले, द्वारका साठवणे, हितेश पताहे, कृष्णकुमार पटले, रंजीत टेंभरे, नागोराव लिचडे, मोनू शेख, हिरालाल मोहरे, आदेश कापसे, राजेश तायवाडे, रघुवीरसिंह उईके, संजय बावनकर, शांतनु पारधी, सुरेश बिरणवार, लंकेश पटले, राजेश सरोदे, दीपक रिनायत, शुभम बोदेले, रवींद्र किसाने, छगन दिहारी, मोरेश्वर सोनेवाने, लोकेश नागभिरे, गोविंद लिचडे, श्रीराम बाळने, नानाजी वाहने, प्रल्हाद डोंगरे, विनोद कोहपरकर, नामदेव बेहार, आरिफभाई पठाण, साहिल पठाण, भरत परिहार, प्रशांत मिश्रा, अजय हरिणखेडे, श्रीराम हरिणखेडे, मोनिष बावनकर, भुवन भगत सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts