भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तुमसर-मोहाडी बाजार समितीत भाजपचे वर्चस्व, 10 जागा जिंकल्या..

967 Views

 

माजी पालकमंत्री डॉ.फुके, माजी खा. शिशुपाल पटले, भाऊराव तुमसरे यांच्या नेतृत्वात विजयश्री..

तुमसर/ 13 मे

भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितिच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप समर्थित बळीराजा पैनलने सर्वाधिक संचालकांना विजयश्री देऊन आपला झेंडा फडकावला आहे.

येथे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके व माजी खा. शिशुपाल पटले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी नेते भाऊराव तुमसरे यांच्या भाजप समर्थित बळीराजा पॅनलने 18 पैकी 10 संचालकाना विजयी करून भाजपचा बालेकिल्ला मजबूत केला आहे.

आज सोमवार दि.13 मे रोजी झालेल्या निवडणूक मतमोजणीत बळीराजा पॅनलचे भाऊराव तुमसरे, रामदयाल पारधी, किरण अतकरी, डॉ.हरेंद्र रहांगडाले, डॉ.अशोक पटले, प्रमोद कटरे, राजेश पटले, वैशाली विनोद पटले, अरविंद कारेमोरे, गणेश बावणे विजयी झाले.

जिल्ह्यातील या बड्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप समर्थित पॅनेलने बाजी मारल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीला आगामी विधानसभा निवडणुकीशी जोडले जात आहे.

या बाजार समिती निवडणुकीत भाजप समर्थित पॅनलला विजयी करण्यात माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे बोलले जात आहे. श्री.फुके यांनी सर्व विजयी संचालक मंडळाचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले.

Related posts