349 Views
गोंदिया/भंडारा (12 फेब्रुवारी)
10-11 फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन व शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी केली आहे.