गोंदिया: नवेगांव-नागझिऱ्यातील वाघांना मिळणार 2 नव्या मैत्रिणी, वाघांची संख्या होणार 13

475 Views

 

खासदार सुनिल मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून दोन वाघिणी सोडणार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती..

प्रतिनिधि। 19 मई

गोंदिया। आमच्याकडे जंगल आहे मात्र जंगलात वाघांची संख्या खूप नाही. मग आम्ही इतर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी जातो. वाघ पाहून संतुष्ट मनाने घराकडे परततो. पण आता दोन वाघिणीच भंडारा जिल्ह्याच्या जंगलात येत आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या व्याघ्र संवर्धनाच्या निर्धारितून उद्या दोन वाघीण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडल्या जाणार आहे. वन्यजीव प्रेमींसाठी अत्यंत सुखद असाच हा क्षण म्हणावा लागेल.


भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य त्याच्या विस्तीर्णतेसाठी आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. जंगलात वाघ, बिबट, अस्वल यासह अनेक प्राणी आहेत. आजच्या घडीला 11 वाघ असून त्यात 9 नर आणि 2 मादी वाघ आहेत. तरीही पर्यटकांची व्याघ्र दर्शनाची भूक भागत नसल्याने त्यांना इतर जिल्ह्यातील ताडोबा सारख्या प्रकल्पात वाघाच्या दर्शनासाठी फिरावे लागते. नैसर्गिक दृष्ट्या संतुलन राखण्याच्या दृष्टीने वाघिणींची संख्या जंगलात वाढणे गरजेचे आहे. वाघांच्या बाबतीत संतुलन राखले जावे यासाठी निसर्गाचा विचार करता आणखी वाघिणी या जंगलात असणे अपेक्षित आहे. वन्यप्रेमींकडून या दृष्टीने सातत्याने मागणी केली जात होती. या मागणीच्या आधारे खासदार सुनिल मेंढे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्यक्ष भेट घेऊनही हा विषय समजावून सांगितला. विषयाचे गांभीर्य ओळखून वनमंत्र्यांनी दोन वेगवेगळ्या वंशाच्या वाघिणी नवेगाव नागझिरा अभयारण्यास भेट म्हणून देण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या 20 मे रोजी या दोन्ही वाघिणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि खासदार सुनील मेंढे यांच्या प्रमुख उपस्थित सोडणार येणार आहेत. निलय विश्रामृहासमोरील जंगल परिसरात या वाघिणी सोडल्या जाणार आहेत. पट्टेदार वाघांची संख्या वाढून पर्यटनाला चालना मिळणे हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन यामागे असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले..

Related posts