मोहाडी ग्रांम पंचायत येथे गौतम बुद्धजयंती उत्साहात साजरी 

322 Views

गोरेगाव – २३/५
तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक २३ मे ला बुद्ध पौर्णिमा निमित्त तथागत गौतम बुद्ध यांची २५८६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच मोहनलाल पटले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन के बिसेन,माजी उपसरपंच श्रीराम पारधी, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंन्डे, योगराज भोयर, प्रभाताई पंधरे, चंन्द्रकांता पटले, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले, नारायण बघेले, कमलेश पारधी,चुळामन पटले, राजकुमार बघेले, हेमराज बिसेन,आदी मान्यवर उपस्थित होते।

यावेळी मान्यवरांनी सांगितले की बुध्द प्रोर्णिमा गौतम बुद्धांची जयंती म्हणून साजरी केली जाते बुद्ध पौर्णिमा ही तिथीनुसार बुद्ध जयंती २३ मे ला साजरी केली जात आहे बुद्ध पौर्णिमेचे पवित्र प्रतिक म्हणजे धर्मचक्र ज्यामध्ये आठ प्रवक्ते आहेत जे बौध्द धर्माचे प्रतिनिधित्व करतात गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला अशा प्रकारे मान्यवरांनी सांगितले
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रांमसेवक पी बी टेंभरे यांनी केले

Related posts