खा. प्रफुल पटेलांच्या आग्रही भुमिकेने चुटिया येथील शेतकऱ्यांना मिळाला न्याय…

684 Views

 

त्या 432 शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे अदा करण्याची प्रक्रिया सुरु

गोंदिया: 5 सेप्टें.

तालुक्यातील चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या धान खरेदी घोटाळा प्रकरणाला घेवुन पणन विभागाकडून ४३२ सह जवळ पास ८०० शेतकऱ्यांचे चुकारे अडविण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाचे उंबरठे झिजविले. तरी चुकारे संदर्भात कसलीही कार्यवाही होत नसल्याने २४ ऑगष्ट रोजी शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाने खासदार श्री प्रफुल पटेल यांच्याशी भेट घेवून व्यवस्था मंडली.

दरम्यान दिलेल्या आश्वासनानुरुप शेतकऱ्यांना न्याय मिळावा या दृष्टिकोणातुन राज्य सरकार, पणन महामंडल, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाशी संपर्क साधुन आग्रही भुमिका घेतली. यामुळे अन्न व नागरी पुरवठा कडून त्या ४३२ शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा करण्याची कार्यवाही करु करण्यात आली आहे.

खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या आग्रही भुमिके मुळे क्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. तसेच उर्वरीत शेतकऱ्यांचे प्रश्न ही मार्गी लावण्यात येणार आहे.

चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या धान घोटाळा उघडकीस आलायामुळे मार्केटिंग फेडरेशन कडून सस्थेला धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे अँडविले. यासाठी शेतकऱ्यांनी आटापिटा सुरु केले मात्र मार्केटिंग फेडरेशन कडून कसला ही प्रतिसाद मिळाला नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी आंदोलनाची भर्मिका स्वीकारली. त्याच प्रमाणे २४ ऑगष्ट रोजी खासदार श्री प्र पटेल जिल्हयाचे दौराऱ्यावर असतांना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेवुन त्यांची व्यवस्था मांडली. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्ग लावण्यासाठी खासदार श्री पटेल यांनी क्षणभराचा वेळ वाया न घलविता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दुरध्वनीवर चर्चा केली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री मा.ना.श्री अजित दादा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.ना.श्री छगन भुजबळ, अन्न व नागरी विभागाचे मुख्य सचिव,मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संपर्क करुन शेतकऱ्यांचे चुकाऱ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे सुचना केल्या. खासदार श्री पटेल यांच्या आग्रही भुमिके मुळे शासन प्रशासन कामाला लागला. सतत च्या पाठपुराव्याने शेतकऱ्याच्या खात्यात चुकारे जमा करण्याची प्रक्रिया विभागाकडून सुरु झालेली आहे. यामुळे चुटियाच्या त्या ४३२ शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. तर उर्वरीत शेतकऱ्यांचे प्रश्न ही मार्गी लावण्यासाठी खासदार श्री पटेल प्रयत्नरत आहेत.

उल्लेखनीय असे कि या प्रकरणाला माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी देखील खासदार श्री प्रफुल पटेल यांचे सतत लक्ष वेधले. त्यामुळे चुटियाच्या शेतकरी तुकाराम बघेले, सुरेश पटले, प्रभु पटले, त्रिलोक ढोमणे, दीपक कंसारे, अनिल पगरवार, जियालाल पटले, गोमाजी टेम्भरे, भूमेश्वर दिहारी, अवंतिका मरघाये, पर्बताबाई राऊत, गुलाब पटले, घनश्याम पटले, सेवक शेंडे, नानू सोंगाडे, श्यामराव लिल्हारे, गुड्डू अंबुले, डिलेश्वर गौतम, शांतीलाल पटले, राजाराम पगरवार, मोतीलाल लिल्हारे, शिशुला लिल्हारे, गणेशलाल लिल्हारे, परबता लिल्हारे, हंसराज लिल्हारे, शोभेलाल कंसारे, गब्बूलाल कंसारे, छोटेलाल रहांगडाले, प्रमोद रहांगडाले, कृष्णकुमार रहांगडाले, रेखाबाई रहांगडाले, राजाराम बघेले, जितेंद्र बघेले, डिलेश्वरी गौतम, रुदन गौतम, भाऊलाल बिसेन, ओमप्रकाश पटले, राजेंद्र तुरकर, प्रीतमलाल ठाकरे, अनुज रहांगडाले, घनश्याम पटले, डीलुचंद तुरकर, चुन्नीलाल येळे, योगराज अटरे, मुन्नालाल गौतम, श्यामलाल गौतम, होऊशलाल गौतम, परशराम गौतम, नंदकिशोर बघेले, सुमित पटले, मुनेश्वर पटले, ताराबाई चौहान, सर्जू चौहान, मोरेश्वर अंबुले, मिलकन बाई अंबुले, कृष्णा पटले, अंजनाबाई शरणागत, रमेश भगत, प्रेमलाल भगत, मोलानबाई चौधरी, माणिकचंद ठाकरे, धनलाल हरिणखेडे, भागचंद पटले, मेघश्याम चौधरी, बिसराम चौधरी, हरिराम पारंगडुरकर व अन्य शेतकऱ्यांनी खासदार श्री पटेल व माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांचे आभार मानले.

Related posts