RTO गोंदिया मार्फ़त वाहन चालकांचे नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर 08 व 09 सप्टेंबर ला..

163 Views

गोंदिया, दि.5 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया मार्फत शुक्रवार व शनिवार 08 व 09 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) गोंदिया येथे नेत्र व अरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात वाहन चालकांची तज्ञ डॉक्टरांद्वारे नेत्र तपासणी करण्यात येऊन मोफत चष्मा वितरण देखील केले जाणार आहे. यासोबतच रक्तविषयक, ब्लडशुगर व ब्लडप्रेशर इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. सर्व तपासण्या या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

सर्व वाहन चालकांना विशेषत: प्रवासी बस, स्कुलबस, टॅक्सी, रिक्षा, ट्रक चालकांनी या मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांनी केले आहे.

Related posts