गोव्यात उद्यापासून पर्यटनाला सुरुवात, पण…

54,647 Viewsगोवा म्हणजे पर्यटनाचं केंद्रच! त्यामुळे गोव्यातील समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळ आणि हॉटेल्स नेहमी देशातील विदेशातील पर्यटकांनी गजबलेल्या असायच्या. पण करोनाच्या विषाणूनं करोना शांत, बंदिस्त होऊन गेला आहे. मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर गोव्यातील पर्यटनासाठी दरवाजे बंद झाले. दरम्यानच्या काळात गोवा करोनामुक्तही झाला. पण, प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर करोना पुन्हा गोव्यात दाखल झाला. अखेर या पाठशिवणीच्या खेळानंतर गोव्यातील पर्यटनाचे दरवाजे उद्यापासून खुले होत आहेत. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी विषयीची माहिती दिली. एकदा करोनामुक्त होऊनही पुन्हा करोनाविरूद्ध लढा देणाऱ्या गोव्यानं पर्यटन खुल करण्याची घोषणा केली.

Read More