गोंदिया: ओबिसीनो आपल्या संवैधानिक अधिकार प्राप्तीसाठी लढ्यात सामील व्हा.., राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आवाहन

622 Views  प्रतिनिधी गोंदिया: घटनेत तरतूद असूनही बहुसंख्य ओबीसी समाज हा आपल्या हक्क व अधिकारापासून वंचीत आहे. त्यामुळे समाजाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. संवैधानिक अधिकार प्राप्तीसाठी ओबीसीनी मतभेद बाजूला सारून एक जुटिने संघर्ष लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केले आहे. 1994 पासून मिळत असलेले ओबीसी संवर्गाचे 27 टक्के राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर धोक्यात आले असून न्यायालयाने यासाठी तीन टेस्ट करावयास सांगितले. त्यानुषंगाने राज्य सरकारने समर्पित आयोगाची स्थापना केलेली आहे. अनुभवजन्य माहिती देखील काही दिवसात गोळा होईल. त्यानंतर कोणत्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका,…

Read More

गोंदिया तालुक्यातील इर्री येथील शेतकरी आंदोलकांची प्रकृती ढासळली, प्रशासनाचे दुर्लक्ष

569 Views  गोंदिया(ता.17) दीड महिन्यापासून तालुक्यातील इर्री येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे हे आपल्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलनावर बसले आहेत. आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी (ता 17) सकाळी त्यांची प्रकृती ढासळली. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तात्काळ मोरवाही येथील आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तब्बल दीड महिन्यापासून सदर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून सदर आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाने डोळे फिरविल्याने परिसरातील शेतकऱ्यांत रोष दिसून येत आहे. येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांची शेतातील झोपडी कोणतेही अतिक्रमण हटाव आदेश नसतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने जमीनदोस्त केली. आपल्यावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध दाद मिळावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून…

Read More

गोंदिया: तलाठ्याकडूनच भरावी ई- पीक पाहणी, टेमनी येथील शेतकऱ्यांची मागणी..

702 Views  गोंदिया (ता–13)सध्या शासनाकडून शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला ई- पीक पाहणी हा प्रकल्प युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे.मात्र या प्रकल्पांतर्गत मोबाईल ॲप मध्ये माहिती अपलोड करतांनी शेतकऱ्यांना मोठी अडचण येत असल्याने सदर अपलोड ची कामे ही तलाठ्याकडूनच करवून घेण्यात यावी, अशी मागणी गोंदिया तालुक्यातील टेमनी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा सरळ लाभ पुरविण्यासाठी शासनाने त्यांच्या शेतातील लागवड केलेल्या पिकांची माहिती शासन दरबारी उपलब्ध व्हावी म्हणून ई -पीक पाहणी प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती मोबाईल ॲप च्या माध्यमातून अपलोड करणे गरजेचे…

Read More

गोंदिया: नागपूर आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.रविशेखर धकाते आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित..

694 Views  प्रतिनिधि। गोंदिया: देशात सुमारे दीड वर्षांपूर्वी अचानक दाखल झालेले कोरोना संकट अजून सुरूच आहे. महाभयानक कोरोनाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले असून कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.या परिस्थितीचा सामना प्रशासन करत असून यात आरोग्य विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या कोरोना काळात विदर्भाच्या कोरोना टास्क फोर्स चे नोडल अधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी जे अविरतपणे परिश्रम घेऊन कोविड 19 च्या दृष्टीचक्रात सापडली असतांना आपण आपल्या जीवाची पर्वा न करता कुशल नेतृत्व, दातूत्व, समयसूचकता दाखवून सर्वसामान्य जनतेची सेवा करून त्यांना मानसिक, भावनिक आधार देण्याचे कार्य करून…

Read More

कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनीच, अंतर ‘जैसे थे’ ठेवणार असल्याचे केंद्राचे संकेत

478 Views  प्रतिनिधि। मुंबई। कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील 84 दिवसांचे अंतर कोरोनाविरुद्ध चांगले संरक्षण देते, असा दावा केंद्र सरकारने शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयात केला. कोरोना लसीकरण मोहिमेची आखणी जागतिक पातळीवरचे शास्त्रीय निष्कर्ष, जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे याचआधारे केली आहे, असे सांगत केंद्राने कोविशिल्डच्या डोसमधील 84 दिवसांचे अंतर ‘जैसे थे’ ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कोचीतील किटेक्स गारमेंट्स कंपनीने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोविशिल्डच्या डोसमधील अंतर कमी करण्यासंबंधी केंद्राला निर्देश देण्याची विनंती कंपनीने केली आहे. त्यावर केंद्र सरकारने शुक्रवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. कोरोना लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तज्ञ…

Read More