गोंदिया: नागपूर आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.रविशेखर धकाते आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित..

335 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया: देशात सुमारे दीड वर्षांपूर्वी अचानक दाखल झालेले कोरोना संकट अजून सुरूच आहे. महाभयानक कोरोनाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले असून कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.या परिस्थितीचा सामना प्रशासन करत असून यात आरोग्य विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या कोरोना काळात विदर्भाच्या कोरोना टास्क फोर्स चे नोडल अधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी जे अविरतपणे परिश्रम घेऊन कोविड 19 च्या दृष्टीचक्रात सापडली असतांना आपण आपल्या जीवाची पर्वा न करता कुशल नेतृत्व, दातूत्व, समयसूचकता दाखवून सर्वसामान्य जनतेची सेवा करून त्यांना मानसिक, भावनिक आधार देण्याचे कार्य करून जी मानवता दाखवली. या प्रेरणादायी कार्यकरिता आकृती थिंक टुडे बहुउद्देशीय संस्था गोंदियाच्या वतीने नागपूर आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ रविशेखर धकाते यांना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते आरोग्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, आकृती थिंक टुडे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गुडधे, उप वनसंरक्षक गोंदिया कुलराज सिंग, जल संधारण अधिकारी गोंदिया अनंत जगताप, संस्थापक अध्यक्ष अधिकारी कर्मचारी समन्वय समिती अनिल देशमुख, सचिव अधिकारी कर्मचारी समन्वय समिती दुलीचंद बुद्धे , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया विजय चव्हाण, उपविभागीय अभियंता गोंदिया संजय कटरे, अध्यक्ष अधिकारी कर्मचारी समन्वय समिती डी.यु.रहांगडाले सह इतर मान्यवर उपस्थितीत होते.

डॉ.धकाते यांना याआधी आनंदीबाई जोशी सर्वोकृष्ट डॉक्टर सन्मान, डॉ. द्वारकानाथ कोटणीस आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय तसेच चौदापेक्षा जास्त राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून डॉ धकाते यांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यावरील आजार शोधणारे उपकरण ग्लुकोमा डिटेक्टर बाजारात येणार आहे. हे उपकरण सामान्य नागरिकांसाठी हे वरदान ठरणार आहे. यासह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबिविले आहेत. डॉ धकाते यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडील, गुरुजनांना,सर्व सहकाऱ्यांना तसेच परिवाराला दिले.

Related posts