गोरेगाँव: माजी उपसरपंच राजा खान यांचे प्रयत्ना मुळे मुंडीपार येथील लावण्यात आले नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर…

245 Views
प्रतिनिधि।
गोरेगांव:- तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील बाजार चौकातील पॉवर ट्रान्सफार्मर फेल झाल्याने आखरटोली परिसरातील वीज पुरवठा ऑक्सिजनवर सुरू होती. भीषण उन्हाडयात ही स्थिति निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांनी माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद (राजाभाई)खान यांच्याकडे तक्रार करून या संकटाचा निराकरण करण्याची माँगणी केली होती।
हा गंभीर विषयावर लक्ष वेधुन लगेच राजा खान यांनी महावितरण चे अधिकारी मोहितकर साहेब यांना समस्येविषयी अवगत केले, आणि ही समस्या वर त्वरित महावितरण चे अधिकारी ने  नवीन पॉवर ट्रान्सफार्मर उपलब्ध करवुन दिले.
गावात कोणतीही समस्या असली की राजाभाई त्वरीत निराकरण करतात. सदर नविन पावर टान्सफार्मर  लावण्यासाठी लाईमेन ठाकरे व सहायक सोमेश पटले तसेच राधाकृष्ण भजन मंडळाचे अध्यक्ष रोहित पांडे, सचिव शिवशंकर बिसेन,अंकुश बोमले,ज्ञानेश्वर राऊत,लिलाधर भोयर,पप्पु पारधी,योगराज भोयर,राहुल राऊत,दिप धमगाये, संतोष चौधरी व राधाकृष्ण  भजन मंडळाचे सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.

Related posts