गोंदिया: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त, युवक-युवतींसाठी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

182 Views

     गोंदिया, दि.14 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमगाव, बिजेपार, सालेकसा व देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने 17 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमगाव (ता.आमगाव) येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

          सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

          इयत्ता 10 वी व 12 वी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

         अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील दुरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर किंवा gondiyarojgar@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.

या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राजु माटे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी केले आहे.

Related posts