गोंदिया: समाजाच्या विकासात स्त्रियांचा विशेष योगदान- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे..

423 Views

 

जिल्हाधिकारी कार्यालयात मूकबधिर मुलांसोबत साजरा करण्यात आला “महिला दिन”

 

गोंदिया: (14) सावित्रीच्या लेकी शिकल्या, सवरल्या, मोठया झाल्या. शासकीय सेवेत आल्या. ज्या समाजाने त्यांना संस्कार दिले, मोठे केले त्या समाजाला विकसित करण्यासाठी स्त्रियांनी मोलाचे योगदान दिले आहे, असे मनोगत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दि 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ” महिला दिन ” या कार्यक्रमात व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, धान्य खरेदी अधिकारी लीना फलके, लेखाधिकारी अनिता कोनाळे, सहा. लेखाधिकारी सीमा वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

समाजात स्त्रियांचे योगदान व त्यांचे कर्तव्य तसेच विविध क्षेत्रात स्त्रियांची कामगिरी मोलाची आहे. संसार करताना येणाऱ्या आवाहन व जबाबदारी स्त्रियांनी निभावलेली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी बेलपत्रे बोलत होत्या.

या कार्यक्रमाचे नियोजन करताना सर्व महिला अधिकारी, कर्मचारी यांनी त्या अर्थाजन करीत असलेल्या पगारातील फुलांची पाकळी ” मंगलम मूकबधिर निवासी शाळा, गोंदिया ” येथील बाल वर्ग 1 ते 7 च्या विद्यार्थ्यांना 50 नग स्कूल बॅग देण्यासाठी समर्पित केली. महिला दिन कार्यक्रम जिल्हाधिकारी श्री चिन्मय गोतमारे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे ह्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळेस मंगलम मूकबधिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य प्रस्तुत करून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे कार्य केले. या वेळेस शाळेच्या मुख्याधिपीका रेशु चौकसे व विशेष शिक्षक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन पूजा पाटील, नियोजन अधिकारी मानव विकास ह्यांनी केले.

Related posts