648 Views
सर्व विभागांची जनजागृती स्टॉल व टेली कन्सल्टेशन सेवा लक्षणीय ठरली
प्रतिनिधि। 20 एप्रिल
गोंदिया। आरोग्य प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्यविषयक विविध उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन आले होते. त्यानुरूप गोंदिया तालुक्यातिल ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे आज दिनाक 20 एप्रिलला तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचा आयोजन करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन श्रीमती आंनदा वाडीवा जि.प. सदस्य काटी व रजेगाव चे सरपंच श्रीमती वंदना रहांगडाले यांच्या अध्यक्षेत श्रीमती वैशालि पंधरे जि.प. सदस्य कामठा यांच्या उपस्थितित करण्यात आले. तर मेळाव्याचा लाभ यातील 1183 नागरिकांनी घेऊन मेळाव्याला उत्पूर्ण प्रतिसाद दिला.
तालुकास्तरीय मेळाव्याच्या कार्यक्रमात श्री.सोनुला बरेले पंचायत समिती सदस्य मोगरा, श्री शिवलाल जमरे पंचायत समिती सदस्य बनाथर , श्रीमती जितेश्वरी रहांगडाले पंचायत समिती सदस्य काटी उपस्थितित होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, खंड विकास अधिकारी श्री.दिलिप खोटेले, निवासि वैद्यकिय अधिकारि डॉ. बि.डि.जायसवाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा क्षयरोग अधिकारि डॉ. नितीन कापसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कु.अर्चना वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या आरोग्य विषय विविध योजना असून सर्व योजनांचा लाभ नागरिकांना घ्यावा. तालुका स्तरीय मेळाव्याच्या निमित्ताने ही संधी आपल्याला प्राप्त झाली असुन येणाऱ्याा काळात अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला आरोग्य तपासणी व उपचार करून घेता येईल यासाठी आरोग्य कार्ड
तयार करून घेण्याचे आवाहन अध्यक्ष महोदय यांनी केले.
मेळाव्याप्रसंगी आयुष्यमान भारत कार्ड तयार करणाऱ्या लाभार्थ्यांना ची 31 लोकांची नोंदणी करण्यात आली तर 7 कार्डचे वाटप करण्यात आले. मेळाव्यात तज्ञ डॉक्टरांकडून 1035 रुग्णांची आरोग्य तपासणी औषधी वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहिलेले सामुदायिक आरोग्य अधिकारी यांनि टेली कन्सल्टन्सी च्या माध्यमातून 89 लोकांना तिथे बसुनच इ-संजीवनी ओपीडी च्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली.
मेळाव्याप्रसंगी तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. हिंमत मेश्राम, डॉ. राजेंद्र अग्रवाल डॉ. गिरीश भोंगाडे,डॉ. पोशनलाल बिसेन डॉ. सायस केंद्रे, डॉ. श्रीवास्तव डॉ. राकेश चिंधालोरे,डॉ. नरेंद्र भांडारकर, डॉ. गौरव अग्रवाल इ. उपस्थितित होते.
मेळाव्याचे संचालन अविनाश वर्हाडे व आरोग्य सहाय्यक शालिकराम जयंजाळ यानी केले तर आभार प्रदर्शन डॉ.अमर खोब्रागडे वैद्यकिय अधिकारि, काटी यांनी मानले. आरोग्य मेळावा यशस्वीतेसाठी सर्व आरोग्य कर्मचारी,आशा सेविका यांनी मोलाचि कामगिरि पार पाडली.