गोंदिया: १३ मार्चला होणार बिरसी विमानतळावरून पहिले प्रवासी उडान, खा.सुनिल मेंढे यांच्या पाठपुराव्याचे फलित

689 Views

 

प्रतिनिधि।
गोोंदिया। बरेच वर्षांपासून रेंगाळत असलेला बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतुक सुरु होणार असून १३ मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे विमान सेवेचा शुभारंभाचा दिवस आला आहे.


विमानतळ तयार होऊन प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला गोंदिया येथील विमानतळावरून सुरुवात झालेली नव्हती. अनेक अडचणी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने येथे होत्या. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सुनील मेंढे यांनी या विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्धार बोलून दाखवीत त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. नागरी वाहतूक मंत्रालयात चे मंत्री, अधिकारी यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार करून आणि भेट घेऊन याचा पाठपुरावा केला. केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी काही महिन्यांपूर्वी भेट घेऊन त्यांना गोंदिया येथुन प्रवासी वाहतुकीची आवश्यकता विशद केली होती. मंत्री महोदयांनी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेला तसे निर्देश दिले होते.


एक खाजगी कंपनी गोंदिया ते इंदोर अशी वाहतूक सेवा सुरू करण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या कामाला गती आली. यातील अडचणी दूर करून व आवश्यक असलेल्या परवानग्या प्राप्त करून या वाहतुकीला आता परवानगी देण्यात आली असून १३ मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी उड्डाण होणार आहे. नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ होणार आहे. या सेवेचा नागरिकांनी लाभ घेऊन आपल्या जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन भंडारा गोंदिया चे खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.

Related posts