ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत उद्या 28 ऑगस्टला गोंदियात, रामनगर येथे भूमिगत केलेल्या लघुदाब विद्युत वाहिनीचा लोकार्पण

131 Views

 

गोंदिया,दि.27 : ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत हे 28 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता माडगी (ता.तुमसर) येथून गोंदियाकडे प्रस्थान. दुपारी 1 वाजता गोंदिया येथे आगमन व शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे राखीव.

दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून रामनगर गोंदिया करीता प्रस्थान. दुपारी 2.15 वाजता एन.एम.डी.कॉलेज सभागृह रामनगर येथे महावितरण, महापारेषण, महाऊर्जा अधिकारी तसेच विद्युत निरीक्षक यांच्या समवेत बैठक.

दुपारी 3.15 वाजता एन.एम.डी.कॉलेज सभागृह रामनगर येथून मनोहरभाई कॉलनी चौक कडे प्रस्थान. दुपारी 3.20 वाजता मनोहरभाई कॉलनी चौक रामनगर येथे भूमिगत केलेल्या लघुदाब विद्युत वाहिनीचा लोकार्पण सोहळा. दुपारी 3.45 वाजता गोंदिया येथून गोरेगाव-सडक अर्जुनी-साकोली मार्गे भंडाराकडे प्रस्थान करतील.

Related posts