व्यसन मुक्त समाज घडविण्यात महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे मोलाचे कार्य – माजी आमदार राजेंद्र जैन

374 Views

 

गोंदिया। व्यसन मुक्त समाज घडविण्यात महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे कार्य मोलाचे आहे. परमात्मा एक सेवक मंडळ महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे कार्य उत्तम पणे पुढे नेत आहेत. व्यसनमुक्त समाज घडविण्यात या मंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्याच बरोबर वर्षानुवर्षा पासून रुजलेल्या अंधश्रद्धा व अनिष्ठ प्रथेचे निर्मूलन करण्याचे कामही या मंडळाच्या वतीने झाले आहे. या मंडळाच्या कार्यामुळे अनेक कुटुंब सतमार्गी लागले आहे तसेच सेवकांचे जिवनमान उंचावत चालले आहे. खऱ्या अर्थाने मानव धर्म व समाज निर्मिती मध्ये परमात्मा एक सेवक मंडळ फार पुढे आहे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.

ग्राम सेजगाव ता. गोंदिया येथे परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर च्या गोंदिया शाखेच्या वतीने भव्य सेवक संमेलन व हवनकार्य आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रम प्रसंगी श्री राजेंद्र जैन यांच्या सोबत सर्वश्री केतन तुरकर, नितीन टेंभरे, सुनिल पटले, रामेश्वर (मुन्ना)चौरागडे, मुनेश्वर कावडे, मुकेश बारेवार, धनेश्वर कावडे, अनिल खरोले, गोपाल बिसेन, योगी येडे, लालचंद बिसेन, जयेंद्र बागडे, अंकुश बर्वे, तुळशीदास बिसेन, रमेश कावळे, गेंदलाल पटले, पदमसिंह नेवारे, अशोक बिसेन, मंगल बागडे, सोनू कावळे, विठ्ठल कावडे, खिलेश बिसेन, गोविंद बिसेन, बंडू सोनवणे, सियाराम बिसेन, राजकुमार गौधरे, कुवरलाल गौधरे, अजितलाल बिसेन, राधेश्याम बिसेन, शोभेलाल खरोले, छबिलाल ठाकरे सहित परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

Related posts