कुडवा येथे भोलेबाबा शिव – माता पार्वती मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा करून माजी आमदार राजेंद्र जैन यांनी घेतला आशीर्वाद

180 Views

 

गोंदिया। ग्राम कुडवा स्थित आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील सार्वजनिक हनुमान मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भोलेनाथ शिवशंकर व माता पार्वती ची पूजा – अर्चना, जलाभिषेक, दुग्धाभिषेक विधीवत पूजन करुन व ओम नमः शिवाय, बम बम भोले च्या गजरात व भाविक भक्तांच्या भक्तिमय वातावरणात मंदिरात मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा, करण्यात आली. माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते व सरपंच श्री बाळकृष्ण पटले यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा व मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाला.

माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी भोलेबाबा शिवशंकर व माता पार्वती च्या चरणात नतमस्तक होत दर्शन घेवून आशीर्वाद घेतला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भोलेनाथ श्री महादेवाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृध्दी लाभो अशी मनोकामना केली व सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच कुडवा मोक्षदाम सेवा समितीच्या वतीने माजी आमदार श्री राजेंद्र जैन, सरपंच श्री बालकृष्ण पटले, श्री केतन तुरकर, श्री शैलेश वासनिक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने सर्वश्री राजेंद्र जैन, बाळकृष्ण पटले, केतन तुरकर, शैलेश वासनिक, संतोष लिल्हारे, राहुल मेश्राम, श्याम बाबा घोडेवाले, बाबा पारधी, दिलीप गौतम, किशोर फरदे, नूतन पटले, अजय पारधी, पटले वेल्डिंगवाले, डॅनी कुर्वे, राजू बोपचे, राज शुक्ला, जितेंद्र तिवारी, रमण ऊके, मिनू शेंडे, विश्वजीत बिसेन, गुड्डू मानकर, ओमकार देऊळकर, राधे तेलासु, बंडू ठाकरे, मनोज बावनथडे, तुषार ऊके, कैलास मेश्राम, अनिल बावनथडे, केशव मानकर, पप्पू बिंझाडे, महेश दांडेकर सहीत भाविक शिव भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते.

Related posts