माजी वनमंत्री डॉ.फुके यांच्या मध्यस्थीने 8 दिवसांपासून सुरू असलेले वनहक्क धारकांचे आमरण उपोषण संपले

341 Views

 

जिल्हाधिकारी, वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय…

गोंदिया (६ जून)

गेल्या 30 मे पासून गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाजवळ वनविभागाच्या, वनवासियां सोबत अन्यायकारक धोरणामुळे या वृत्तीच्या निषेधार्थ सामुहिक वनहक्क धारक आंदोलनावर 8 दिवसांपासून बसले होते. आदिवासी बांधवावर झालेल्या या अन्यायाबाबत त्वरित दखल घेत 6 जून ला राज्याचे माजी वनमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी या आमरण आंदोलन स्थळाला भेट दिली.

आंदोलकांच्या भेटीदरम्यान माजी मंत्र्यांनी वनहक्क कायद्यांतर्गत अधिकार असूनही सामूहिक ग्रामसभांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत कृतीशील वृत्तीचा अवलंब करून या अन्यायाविरुद्ध आपला पाठिंबा दर्शविला.

वनवासी शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत वनाधिकाऱ्यांच्या चुकीच्या प्रवृत्तीविरोधात कठोर भूमिका घेत त्यांनी स्वत: उपोषणाला बसून अधिकाऱ्यांना देवरी येथे बोलावून घेतले.

देवरीच्या तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, डीएफओ कुलराज सिंह, वनाधिकारी तेंदू कॅम्प आर. आर.सदगीर, एसडीओ देवरी अनमोल सागर यांची बैठक घेऊन उपोषणकर्त्यांच्या विविध मागण्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. .

माजी पालकमंत्री डॉ.फुके यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान ऍड. दिलीप गोडे सर, वीरेंद्र (बाळा भाऊ) अंजनकर, माजी आमदार संजय पुराम यांच्यासह उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

बैठकीत वनविभागाला अनुसूचित जमाती व अपारंपरिक वननिवासी अधिनियम 2006 व नियम 2008 व सुधारित नियम 2012 (वन हक्क कायदा 2006) व ग्रामसभेला मिळालेल्या इतर मालकी हक्कांबाबत येणाऱ्या अडथळ्या,
ग्रामसभा वनहक्क शेतकऱ्यांवर कारवाई करणे, वनोपज तेंदूपत्ता गोळा करण्याचा अधिकार ग्रामसभेला असताना, तेंदूपान तुड़ाई, संकलन, वाहतूक आणि बिक्री वर बंदी घालणे, ग्राममहासभेत समाविष्ट परसोडी, येलमागोंदी, केशोरी, उचेपूर, मोहगाव या वनहक्क दाव्याच्या प्रलंबित प्रकरणांवर, बाबत सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीत माजी वनमंत्री डॉ. परिणय फुके, यांच्या मध्यस्थीने, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वनविभागाने परस्पर समन्वयातून तोड़गा काढून निर्णय घेतला की, सामुहिक वनहक्क ग्रामसभा कडून सुरू असलेल्या प्रक्रियेत वनविभाग कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही।

आगामी वनउत्पादन प्रक्रियेसाठी, वनविभाग आणि सामुहिक वनहक्क ग्रामसभा (CFR) यांनी एकत्रितपणे संयुक्त सर्वेक्षण करून हंगामापूर्वी नोव्हेंबरपर्यंत सर्व योग्य कार्यवाही, तेंदूपत्ता तोडणी, संकलन, विक्री, वाहतूक इत्यादी पूर्ण करण्यासाठी सहमतीने चर्चा झाली.

या बैठकीत वेळी उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ मध्ये नारायण सलामे, गोपाल कोरेती, मडावी गुरुजी, चेतन उईके, राजू साहू, मोतीराम सायम, नेतराम हिडामी, जग सलामे, महारू भोंगाडे, बळीराम कुंभारे, संतोष भोयर, नूतन कोरे, जयराम कोरेती यांचा समावेश होता. , खेमराज सलामे, धनुष जनबंधू यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यां नी समाधान व्यक्त करूँन आमरण अनशन मागे घेतले.

Related posts