भंडारा: कोरोना संकट काळात जनतेला उत्कृष्ट सेवा देणारे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन तर्फे सत्कार

357 Views

 

 

भंडारा। आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी कोरोना महामारीच्या काळातीळ कठीण प्रसंगी ऑक्सीजनचा मुबलक पुरवठा तसेच रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्याला उपलब्ध करून जनतेला सेवा दिलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन च्या वतीने सत्कार करण्यात आला.

खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, संजय खत्री, रामदास कुरंजेकर, संजय निंबार्ते, निकेत क्षीरसागर, गजानन कुरजेकर, हेमंत महाकाळकर, रमेश तलदार, नियाज खान, संजय पटले, अशोक ठाकरे, दिनेश सोहनी, दिनेश शर्मा, रवी लक्षणे, प्रदीप सुखदेवे, रूपक अडिया सहित बहुसंख्येने असोसिएशनचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Related posts