गोंदिया: अनोळखी मयत पुरुष, नातेवाईकाचा शोध घेणे सुरु

342 Views

      गोंदिया,दि.9 : 8 मार्च 2023 रोजी ऑन ड्युटी डी.वाय.एस.एस. रेल्वे स्टेशन गोंदिया यांनी पुजा जितेंद्र सहारे, वय 29 वर्षे, व्यवसाय पोर्टर, मु. साऊथ कॉलोनी गोंदिया यांचे हस्ते पोलीस स्टेशनला मेमो व डेथ सर्टिफिकेट आणून हजर केल्याने मेमो पाहता एक अज्ञात पुरुष, वय अंदाजे 45 वर्षे हा रेल्वे स्टेशन गोंदिया येथील मेन बुकींग तिकीट ऑफीसचे समोर अचेत अवस्थेत पडलेला आहे अशा प्राप्त मेमो वरुन पोलीस हवालदार/187 नन्नावरे व पोलीस कॉन्स्टेबल/1013 असे नमुद घटनास्थळी जाऊन नमुद अज्ञात पुरुषास रेल्वे डॉक्टर यांनी तपासून मृत घोषित केल्याने प्रभारी अधिकारी यांचे आदेशाने नंबरी मर्ग नंबर 10/2023 कलम 174 जा.फौ. प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

         मृतक इसमाचे वर्णन :- वय- अंदाजे 45 वर्षे, उंची- 5 फुट 5 इंच, चेहरा- लांबट, बांधा- सडपातळ, डोक्याचे केस- काळे, पांढरे. गोंदलेले- नाही, नेसणीस- कथ्या रंगाचा फुल बाहीचा शर्ट व त्याखाली सिमेंट रंगाचा फुलपॅन्ट आहे. असे तपासी अंमलदार शेषराव नन्नावरे, रेल्वे पोलीस स्टेशन गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related posts