शेतकऱ्यांसाठी धान खरेदीस 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

608 Views

 

गोंदिया, दि.1 : शासकीय आधारभुत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीकरीता देण्यात आलेले उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नसल्याने शासनाने खरीप हंगामासाठी धान खरेदीची मुदत    8 मार्च 2023 पर्यंत दिलेली आहे. करीता नोंदणी झालेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत आपल्या तालुक्यातील जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन धान विक्री पूर्ण करुन घ्यावी. धान विक्रीसाठी देऊन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

Related posts