ओबीसी प्रकरणात सर्वोच न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून स्वागत…

788 Views
प्रतिनिधि।
गोंदिया। बऱ्याच दिवसांपासून रेगांळत पडलेल्या ओबीसी आरक्षणाच्या संबंधाने सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होवून महाविकास आघाडी सरकारने स्थापण केलेल्या बांठिया आयोगाचा अहवाल आज सर्वोच्च न्यायालयाने स्विकारला असून ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
तसेच बांठिया आयोगाची स्थापणा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील ओबीसीचे नेते छगन भुजबळ, खासदार प्रफुल पटेल यांचे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
मागील तीन चार वर्षापासून ओबीसी आरक्षणाचा विषय आरोप प्रत्यारोप मध्ये पडून होता. अडीच वर्षापूर्वी राज्यात महाआघाडी चे सरकार स्थापण झाले तेव्हा हा विषय ऐरणीवर आला. तत्कालीन देवेद्र फडणवीस सरकारच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल झाल्या होत्या, तेव्हा तो निर्णय ओबीसी प्रवर्गाच्या विरोधात गेला. आणि महाविकास आघाडी वरती चौफेर टिका होवू लागली.
महाविकास आघाडी ने केंद्र सरकारकडे असलेला इंपिरिकल डाटा मिळावा म्हणुन खुप प्रयत्न केले. परंतु केंद्र सरकार ने तो डाटा दिला नाही. त्यामुळे
राज्यातील महाविकास आघाडी सरकार वर टिका होवू लागली, परंतु महाविकास आघाडी सरकारने ओबीसी प्रवर्गाची माहीती गोळा करण्याकरीता बांठिया आयोगाची स्थापणा केली. आणि बांठिया आयोगाने युद्ध स्तरावर राज्यातील महसुल व ग्रांम विकास विभागाची यंत्रणा कामाला लावून माहिती गोळा केली. अत्यंत कमी वेळात माहिती गोळा करुन तो अहवाल राज्य शासनाला सादर केला. राज्य शासनाने तोच अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करुन आज त्याच अहवालाच्या आधारावर सुनावणी होवून ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला.
या निर्णयाचे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस कडुन स्वागत करण्यात येत असून यासाठी विषेश प्रयत्न करणारे महाविकास आघाडीतील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील ओबीसीचे नेते छगन भुजबळ, खासदार प्रफुल पटेल यांचे माजी
आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी आभार व्यक्त केले.

Related posts