गोंदिया: “विज दरवाढ विरोधात आम आदमी पार्टीचे १३ ला राज्यव्यापी आंदोलन”

528 Views

सरकारने विजेच्या दरात भरमसाठ वाढ करुन मोठा आर्थिक झटका दिला– पुरुषोत्तम मोदी

प्रतिनिधि। 11जुलै
गोंदिया :-आम आदमी पार्टी गोंदिया येथिल कार्यकर्त्यांनी स्थानिक आम आदमी रैन बसेरा येथे एक बैठक घेतली. या बैठकीत सर्वानूमतेने विजदरवाढ विरोधात राज्यव्यापी आंदोलन यशस्वी करनण्याचे ठरविण्यात आले आहे.
महागाईमुळे होरपळलेल्या महाराष्ट्रात नव्याने सत्तेतवर असलेल्या सरकारने विजेच्या दरात भरमसाठ वाढ करुन मोठा आर्थिक झटका दिला आहे. राज्य सरकारच्या या जनविरोधी निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टीने बुधवार दिनांक १३/७/२०२२ रोजी १२:०० वाजता जयस्तंभ चौक येथे राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होन्याचा निर्णय घेतला आहे.
सत्तेत येणारे सरकार जनतेला खोटे आश्वासन देत आहे. मात्र आम आदमी पार्टी दिल्ली पंजाब मध्ये जनतेच्या आस्वासनाची पूरतः करत असून जनतेला २०० युनिट प्रति महिना वीज मोफत देत आहे. त्यामूळे दिल्लीतील ७२% जनतेला विज बिल शुन्य येते. तसेच पंजाब मधील जनतेला १ जुलै २०२२ पासून ३०० युनिट वीज मोफत देन्याचे आस्वासन पूर्ण केले आहे.परंतू महाराष्ट्रात सरकारला अडीच रुपये युनिटला मिळणारी विज १० ते १५ रुपये युनिट  विकनारे सावकारी सरकार आहे. आता या सावकारी सरकारच्या विजदरवाढ विरोधात आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे.
सर्व आम जनतेला आवहान करन्यात येत आहे की दिनांक १३/७/२०२२ रोजी  जनहीतार्थ आंदोलनामध्ये बहुसंख्येने सहभागी होऊन विज दरवाढीचा विरोध करावा.
या बैठकिला  जिला संयोजक उमेश दमाहे,जिला सचिव मिलन चौधरी, गोंदिया शहर अध्यक्ष करण चिचखेड़े, शहर महिला अध्यक्ष प्रमिला उईके, शहर युवा अध्यक्ष अंकुश वाखले, सचिव मिलिंद नागदेवे, कोषाध्यक्ष अशोक कुर्वे, यशवंत मेश्राम, अनामिका अग्रवाल,  खालिल प्रमाणे पदाधिकारी हजर होते.

Related posts