गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ची धान खरेदीचे उद्दिष्ट्य वाढवून देण्याची मागणी..

444 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। जिल्ह्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. गोंदिया जिल्ह्यात या वर्षी सुमारे ६५ हजार हेक्टर शेत जमिनीवर उन्हाळी धानाचे उत्पादन घेण्यात आले. उत्पादन क्षेत्र जास्त असूनही शासनाच्या कृषी विभागाच्या निर्णयानुसार फक्त ४३ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन क्षमता ठरवून दिलेली आहे. अनेक वर्षा पासून उन्हाळी धानाची खरेदी शासनाकडून हमी भावाने केली जाते. या वर्षी धानाची खरेदी करण्यात आली पण खरेदी ची मर्यादा कमी करून शेतकरी वर्गाला मोठ्या संकटात टाकण्याचे काम केले आहे.

मागील वर्षी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ मिळून २८ लक्ष क्विंटल धान खरेदी करण्यात आली. मात्र यावर्षी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ मिळून १३ लक्ष क्विंटल धान खरेदी करण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले. त्यामुळे लाखो क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. सध्या धान खरेदीचे उद्दिष्ट्य वाढवून मिळाले नाही तर शेतकऱ्यांना धान पडीत भावाने १९४० रुपये ऐवजी १२०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकावे लागेल व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल.

त्यामुळे गोंदिया जिल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वश्री गंगाधर परशुरामकर, अविनाश काशिवार, रमेश चुर्हे, केतन तुरकर, योगेश पडोळे, प्रभू लोहिया, प्रल्हाद बावनकुळे, आत्माराम कापगते, ग्यानिराम कापगते, दिलीप कापगते, होमेश्वर परशुरामकर, प्रेमकुमार रहांगडाले यांच्या सह हजारो शेतकऱ्यांनी धान खरेदीचे उद्दिष्ट्य वाढवून देण्याची मागणी केली आहे.

Related posts