प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश: “मेडिकलच्या” इमारत बांधकामाला येणार गती : ४४१ कोटी रुपयांची तरतूद

708 Views

 

महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी पहिला टप्पा ६८.९० कोटींचा निधी मंजूर : HSCC लि. कंपनीची निवड..

गोंदिया। 30 मार्च

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) बांधकामाला गती येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून बांधकामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी केंद्र शासनाच्या एचएससीसी लिमिटेड कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयुक्त, वैद्यकीय शिक्षण तथा संशोधन संचालनालय यांनी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) इमारतीचा बांधकामासाठी मंजूर निधीचा पहिला टप्पा ६८.९० कोटींचा निधीला खासदार श्री प्रफुल पटेल यांचा पाठपुरावा नंतर मान्यता मिळाली आहे, यासंबंधीचे पत्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने २४ मार्च रोजी काढले आहे.

येथे मेडिकल कॉलेज मंजूर होवून सात ते आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मेडिकलच्या बांधकामासाठी शहरातील कुडवा परिसरात जागा सुध्दा निश्चित केली आहे. इमारत बांधकामासाठी ४४१ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी शासनाने वर्षभरापुर्वीच मंजूर केला आहे. पण इमारत बांधकामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. परिणामी मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरु आहे. त्यामुळे मेडिकलचे डॉक़्टर आणि विद्यार्थ्यांना सुध्दा विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. तर विद्यार्थ्यांना वसतिगृहासह इतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत चर्चा करुन मेडिकल इमारत बांधकामाला एजन्सीची नियुक्ती करुन त्वरित सुरुवात करण्यासंदर्भात चर्चा केली होती. याचीच दखल घेत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने २४ मार्च रोजी मेडिकल इमारत बांधकामासाठी केंद्र शासनाच्या एचएससीसी लिमिटेड कंपनीची नियुक्ती आहे. त्यामुळे आता इमारत बांधकामाला गती येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Related posts