गोंदिया: दिव्यांग विद्यार्थी शिबिराला जिप सीईओ पाटील यांची भेट, विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी साधला संवाद

175 Views

सर्व शिक्षा अभियान चा उपक्रम, पुढील तीन दिवस चालणार शिबिर..

प्रतिनिधि। 23 सेप्टेंबर
गोंदिया। शिक्षण घेतांना व समाजात आपले दैनंदिन जीवन व्यतीत करताना दिव्यांगतत्व अडथळा म्हणून समोर येऊ नये या करीता सर्व शिक्षा अभियान च्या दिव्यांग विभागामार्फत जिल्हयातील आंगणवडी तथा इयत्ता पहिली ते बारावी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलांना विविध साहित्याचा पुरवठा करण्यात येतो.
त्याच अनुषंगाने आज जिल्ह्यातील 352 मुलांकरिता चार दिवसीय शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडवा येथील थेरेपी सेंटर मध्ये करण्यात आले आहे।
 या शिबिराला आज 23 सेप्टेंबर ला जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल पाटिल यांनी भेट देऊन विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधला. शिबिराची पाहणी करतांना त्यांनी विभागाचे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांच्या कडून विस्तृत माहिती घेतली.
याभेटी वेळी त्यांच्या सोबत जिल्हा शल्य चिकित्सक अमरीश मोहबे, शिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम, गोंदिया गटशिक्षणाधिकारी जे. एस. राऊत उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीसाठी समग्र शिक्षा, जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र तथा सर्व शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत.

Related posts