गोंदिया: पांगोली च्या तीरावर टेमनीतील युवकांची स्वच्छता मोहीम, सर्वत्र कौतुक

422 Views

 

गोंदिया (ता.22)गणेश विसर्जना निमित्त पांगोली च्या तिरावर मोठ्या प्रमाणात जमा झालेले निर्माल्य स्वच्छता मोहीम राबवून टेमनी येथिल युवकांनी स्वच्छ केले.त्यांनी केलेल्या या समाजपयोगी कार्याचा सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

गोंदिया शहरातील गणेश भक्त गणपती विसर्जनासाठी लागूनच असलेल्या टेमनी च्या पांगोली तीरावर येत असतात. यावर्षी शुद्धा या काठावर मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विसर्जना साठी आल्या. मूर्ती विसर्जन केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माल्य,केरकचरा तसेच इतर साहित्य जमा होत असते. हे साहित्य तसेच ठेवून नागरिक आपल्या घराला निघून जातात. त्यामुळे नदी परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य व केर कचरा जमा झाला होता.

गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जमा झालेला निर्माल्य येथील मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष संदिप बानेवार, दुर्योधन वंजारी, सुधाकर मारबदे,राजू टेकाम, रजनीश वंजारी, सुनील मरसकोल्हे,गिरीशंकर नेवारे,दीपेश्वर मारबदे, राहुल सहारे, मुन्ना सहारे,सतीश बानेवार, हिरालाल बागडे, शैलेंद्र मालगाम,जितेंद्र सहारे, इंद्रराज सहारे, स्वराज मलगाम, यांनी स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसरातील घाण कचरा जमा केले. व संपूर्ण पांगोली चा परिसर स्वच्छ केला.

त्यामुळे आता हा परिसर सुंदर व स्वच्छ दिसत असून नागरिकांनी या कार्यासाठी मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट च्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक केले आहे.

Related posts