गोंदिया: जिल्ह्यात आरोग्याच्या विवीध जनजागृती पर कार्यक्रमासह आरोग्य शिबीरे, वृक्ष संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम उत्कृष्टपणे राबवून तसेच युवकांच्या सामाजिक, सांस्कृतिक सह सर्वांगीण विकासासाठी मागील पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ कार्य करणारे प्रमोद लक्ष्मणराव गुडधे यांच्या कार्याची दखल घेत अधिकारी कर्मचारी समन्वय समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हाधिकारी नयना गुंडे, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते विशेष सन्मानासह युवारत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी डॉ.रवी धकाते सहायक संचालक आरोग्य विभाग नागपूर, कुलराज सिंग-उप वनसंरक्षक गोंदिया, अनंत जगताप-जल संधारण अधिकारी गोंदिया, अनिल देशमुख संस्थापक अध्यक्ष अधिकारी कर्मचारी समन्वय समिती, दुलीचंद बुद्धे सचिव अधिकारी कर्मचारी समन्वय समिती, विजय चव्हाण-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया, संजय कटरे-उप विभागीय अभियंता गोंदिया, डी.यु.रहांगडाले-अध्यक्ष अधिकारी कर्मचारी समन्वय समिती सह इतर मान्यवर उपस्थितीत होते.
उपक्रम राबविण्यात खूप अडचणींना सामोरे जावे लागले पण सर्वांच्या सहकार्या मुळेच उपक्रम यशस्वी राबविण्यात यश आले असे मत प्रमोद गुडधे यांनी व्यक्त केले.
युवारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल योगेश सोनूले, नरेंद्र दियेवार, लक्ष्मण गुडधे, विजय टिकरिया,श्रीकांत गिऱ्हे, रितेश नंदेश्वर, कैलाश पटले, विष्णू तिवारी, प्रदीप मेंढे, किशोर पटले, एम.आर.ठाकरे, सुनील तिडके सह इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.