भंडारा जिल्ह्यात आज 277 कोरोना पॉझिटिव्ह, 71 रूग्णांना डिस्चार्ज..2 मृत्यु

209 Views

 

पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 4950
बरे झालेले रुग्ण 2959
क्रियाशील रुग्ण 1888
आज 02 मृत्यू
एकूण मृत्यू 103

भंडारा दि.27 (जिमाका) जिल्ह्यात आज 277 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज 71 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2959 झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4950 झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 151, साकोली 24, लाखांदूर 07, तुमसर 22, मोहाडी 26, पवनी 26 व लाखनी तालुक्यातील 21 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 2959 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 4950 झाली असून 1888 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 103 झाली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 2590, साकोली – 344, लाखांदुर- 211, तुमसर- 467, मोहाडी- 474, पवनी- 405 व लाखनी- 459 असे एकूण 4950 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 2959 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02 टक्के एवढा आहे.
आज 27 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 180 व्यक्ती भरती असून 2081 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून  डिस्चार्ज  देण्यात आला आहे.

Related posts