राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन
गोंदिया। आज एन.एम. डी. महाविद्यालय आडिटोरिअम येथे सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा जाहीर सत्कार तसेच अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्राचे निर्वाचित आमदार राजकुमार बडोले, नवनियुक्त जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, नवनियुक्त सभापती अर्जुनी मोर. सौ.आम्रपाली डोंगरवार, नवनियुक्त उपसभापती शिवलाल जमरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.
यावेळी प्रदेश प्रतिनिधी, गोंदिया जिल्हाचे सर्व सेल व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका महिला अध्यक्ष, तालुका युवक अध्यक्ष, सर्व तालुका सेल व आघाड्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना अधिक समृद्ध करण्यासाठी आर्थिक उन्नती होण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय व सहकार क्षेत्राची जोड देण्याचे काम महायुती सरकार करणार आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या गृह जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वांना सोबत घेउन जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचे व जिल्ह्याच्या विकासासाठी जे शक्य होईल ते प्रामाणिकपणे काम करण्याची याची ग्वाही पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राच्या विकासात सर्वात मोठा वाटा महायुती सरकारचा आहे. खासदार प्रफुल पटेल यांनी दोन्ही जिल्ह्याची प्रगती व उन्नती करण्याचे काम सदैव केले आहे. श्री पटेलजी यांचे सक्षम नेतृत्व आमच्या कडे असल्याने जिल्ह्यात पक्षाचे संगठन मजबूत करण्याचे काम सतत आम्ही करतो असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो हे आमचे सौभाग्य आहे. जिल्ह्यातील अनेक समस्या व प्रश्नांना मार्गी लावून विकासाचे नवीन व्हिजन व दुर दृष्टीकोन त्यांच्या कडे आहे. निवडणुकीत आपण निवडून आणून आशीर्वाद दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असे प्रतिपादन आमदार राजकुमार बडोले यांनी केले.