गोंदिया: शेतकऱ्यांचा हितासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष वचनबध्द-माजी आमदार राजेंद्र जैन

305 Views

 

पांढराबोडी येथे अनेकांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश…

प्रतिनिधि।

गोंदिया। परिसरातील शेतकऱ्यांचे हितासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष व पक्षा चे नेते खा. श्री प्रफुल पटेल हे वचनबध्द आहेत. शेतकऱ्यांचे हित कसा साधता येईल यासाठी आम्ही नेहमीच काम करित आहोत असे उदगार माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आज पांढराबोडी येथे आयोजित पक्ष बैठकीत व्यक्त केले. त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच आगामी जि.प., पं.स. निवडणूकी विषयी चर्चा केली. आजच्या बैठकीत त्यांचे समवेत प्रामुख्याने सर्वश्री बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, अखिलेश सेठ, सुनिल पटले, चंदन गजभिये, नेमीचंद ढेकवार, शैलेश वासनिक, सौरभ रोकडे, बालु चन्ने, जितेंद्र चिखलोंढे, छबीलाल लिल्हारे, अंगद नागपुरे, अश्विन ढोमणे, गिरजाशंकर नागपुरे,, रणजीत शेंडे, जितेंद्र ढेकवार, तेजलाल नागपुरे, भागवत पटले, रविन्द्र ढोमणे, मोहन मसराम व इतर उपस्थित थे । या पक्ष बैठकीत परिसरातील इतर पक्षाचे सर्वश्री शामराव लिल्हारे, त्रिलोक ढोमने, सुनिल गजभिये, विशाल गजभिये, नितेश मेश्राम, पवन केवट, विवेक गजभिये, ओमप्रकाश ढेकवार, सुरेश कावळे, रेखलाल सुलाखे, दुर्गाप्रसाद डहारे, सेवक चिखलोंढे, मनोहर दमाहे, भागवत पटले, राकेश सुलाखे, प्रदिप ठाकरे, श्यामराव लिल्हारे, अश्विन शेंडे , रामकुमार ठकरेले, चैनलाल ढोमणे, राकेश बिसेन, तिलक गराडे, जितु लिल्हारे,संदिप तुरकर, राजु कोल्हे, युवराज ढोमणे, गोविंदराव श्रीरंगे, मोहन गिरधारी मेश्राम, उमेश उके, रविन्द्र ढोमणे व इतरांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

Related posts