गोरेगाँव: पंचायत समिती स्तरावर होणाऱ्या तिमाही सभेत सरपंच ना आमंत्रित करण्यात यावे..

519 Views

 

गोरेगाव तालुका सरपंच – उपसरपचसंघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन

गोरेगाव – ०5 सप्टेंबर
गोरेगाव तालुका सरपंच -उपसरपच संघटनेच्या वतीने आज दिनांक ४ सप्टेंबर ला ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचे शासननिर्णय नुसार पंचायत समिती स्तरावर दर तिमाही सभेचे आयोजन करूण सरपंच, उपसरपंच व सचिव याची संयुक्त सभा घेण्यात यावी प्रशासन व्यवस्थेत पंचायत राज संस्थाची भुमिका व कार्य महत्वपूर्ण आहे शासनाच्या विविध योजना, धोरणात्मक निर्णय जनतेपर्यंत पोहचवुण त्याची सुनिश्चित व शित्तबध्द अंमलबजावणी करून जनतेपर्यंत पोहचवुण जनतेच्या अडिअडचणी शासनापर्यंत पोहचविण्याचे जवाबदारी संयुक्तपणे सरपंच व सचिव याची आहे।

या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावर दर तीन महिन्यांनी सभेचे आयोजन करूण जनतेचे जनप्रतिनिधी सरपंच यांना आमंत्रित करण्यात यावे पण मागील आठ महिन्यांपासून गोरेगाव पंचायत समिती स्तरावर अशा सभेचे आयोजन न केलेल्या मुळे आज गोरेगाव तालुका सरपंच -उपसरपच संघटनेच्या वतीने गोरेगाव पंचायत समिती चे सहायक गटविकास अधिकारी एच व्ही गौतम यांना निवेदन देण्यात आले।

यावेळी पंचायत विस्तार अधिकारी टि डी बिसेन, सहायक अभियंता शेंबेकर, तालुका सरपंच -उपसरपच संघटनेचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, उपाध्यक्ष विजय बिसेन, जिल्हा महिला अध्यक्ष वर्षाताई पटले,कालीमाटी येतील सरपंच सोनाली साखरे, कवलेवाडा सरपंच शकुंतला कटरे,हिरटोला येतील सरपंच माधवी डोंगरे,पिपरटोला सरपंच वैशाली कुसराम,सोनी सरपंच हेमेश्वरी हरीणखेडे तेंलनखेडी सरपंच रिता बिसेन,सिलेगांव सरपंच डॉ गणेश बघेले, सोनेगाव सरपंच भुमेश्वरी ठाकरे,घुमर्रा सरपंच सविता फुंन्डे,गोदेखारी सरपंच टि के कटरे, उपसरपंच चंन्द्रशेखर बोपचे,झनकलाल चौव्हाण, यशवंत कावडे,लिलेश्वर बहेकार माजी सरपंच सोमेश्वर राहांगडाले दवडीपार सरपंच कटरे गुरूजी,कलपाथरी सरपंच शेषकुमार रांहागडाले, आदी सरपंच, उपसरपंच मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते।

Related posts