गोंदिया। उद्यापासून शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर; वाचा किती दिवस असणार सुट्टी…

1,480 Views  प्रतिनिधि। 27 ऑक्टो. गोंदिया : राज्यातल्या शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे शाळा कधीपर्यंत सुरु राहणार आणि सुट्टी कधी लागणार याची उत्सुकता होती. आज सरकारने राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी असणार आहे. अर्थात शाळांना दिवाळीच्या 12 दिवस सुट्टी असेल. शाळांमध्ये सुट्ट्या जाहीर झाल्या नव्हती त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. राज्यातील अन्य विभागात शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मुंबईत मात्र…

Read More

दिवाळीपूर्वी सुरु होणार धान खरेदी केंद्र, ३० ऑक्टोबरपासून खरेदीला होणार सुरुवात : यंदा मिळणार १९४० रुपये प्रतिक्विंटल दर- खा. प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर पाऊल

4,190 Views  गोंदिया : खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीला सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी हलक्या धानाची विक्री करून शेतकरी उधार-उसणवारी फेडून दिवाळ सण साजरा करतात. हलके धान आता बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरु व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर आता शासनाने सुध्दा त्याला हिरवी झेंडी दिली आहे. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४२ अशा…

Read More

राज्यात आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार..!! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंची माहिती

946 Views  मुंबई : पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असल्याने आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी सर्वच अधिकाऱ्यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची विनंती केली. तसेच पाचवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले नसले तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी शाळांमध्ये येऊन बसत आहेत. त्यांना शिकवलेदेखील जात आहे.वर्षा गायकवाड यांनी सांगितले…

Read More

नगरसेवक राजेश गुनेरीया, राखी गुनेरिया, गजभिये यांचा अनेक कार्यकर्तासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश

1,066 Views  गोंदिया, ता. 17 : खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगरसेवक राजेश गुनेरीया, श्रीमती राखी गुनेरीया, पत्रकार तथा महाप्रज्ञा बुद्ध विहार समीतीचे अध्यक्ष अतुल गजभिये, भावना गजभिये, युवा कार्यकर्ते साजन रामटेके यांनी आज (ता. 17) अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन स्वागत केले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अजयसिंह गौर, माजी जि. प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी जिल्हा परिषदेचे पक्षनेता गंगाधर परशुरामकर, माजी जि. प. सदस्य श्रीमती राजलक्ष्मी तुरकर, कैलास पटले, अभियंता…

Read More

१५ कोटीच्या निधीतून भंडारा शहरामध्ये साकारणार नाट्यगृह, प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्यानंतर पाऊल

822 Views  प्रतिनिधि। भंडारा : भंडारा शहराला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्यात अनेक थोर साहित्यिक व कलावंत आहेत. मात्र कलावंताना त्यांच्यातील कलागुणांचे दर्शन घडविण्यासाठी व्यासपीठ व मंच नसल्याने मोठी अडचण होत होती. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर भंडारा येथे अत्याधुनिक दर्जाचे नाट्यगृह तयार करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधीला मंजूर केला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ५० लाखांचा निधी दिला असून उर्वरित निधी लवकरच दिला जाणार आहे. शहरात नाट्यगृहा अभावि नाट्य प्रेमींसह आयोजकांचा हिरमोड होत होता. शहरात आधुनिक नाट्यगृह तयार व्हावा,…

Read More