नगरसेवक राजेश गुनेरीया, राखी गुनेरिया, गजभिये यांचा अनेक कार्यकर्तासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश

525 Views

 

गोंदिया, ता. 17 : खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगरसेवक राजेश गुनेरीया, श्रीमती राखी गुनेरीया, पत्रकार तथा महाप्रज्ञा बुद्ध विहार समीतीचे अध्यक्ष अतुल गजभिये, भावना गजभिये, युवा कार्यकर्ते साजन रामटेके यांनी आज (ता. 17) अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन स्वागत केले.

यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अजयसिंह गौर, माजी जि. प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी जिल्हा परिषदेचे पक्षनेता गंगाधर परशुरामकर, माजी जि. प. सदस्य श्रीमती राजलक्ष्मी तुरकर, कैलास पटले, अभियंता दहाटे, नगरसेवक प्रभु असाटी, माजी नगरसेवक सलीम जवेरी, सामाजिक कार्यकर्ते अजय वैद्य, विजय बुराडे, डॉ. संदीप मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

माधोराव ठवकर, रमेश भोयर, ढोमने काकाजी, रवी घरडे, जयेंद्र कोटांगले, विजय गौरे, आरजु रामटेके, पुरण चौरे, नत्थु राणे, विकास दरवडे, सुदाम बांडेबुचे, मुंनेश्वर कारेमोरे, मंसाराम बांडेबुचे, राजकुमार खोब्रागडे, कश्यप भालेराव, सचिन राऊत, अशिकांत चौरे, मोहित कोटांगले, तन्मय रामटेके, अभिजित टेंभेकर, राकेश भास्कर यांनी सुद्धा पक्ष प्रवेश केला. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Related posts