खा.पटेलांची आश्वासनपुर्ती; ३० ऑक्टोबरपासून धानखरेदी केंद्र सुरू..

720 Views

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे १०७ तर आविमचे ४४ केंद्र मंजूर..

प्रतिनिधि। 28 ऑक्टो.
गोंदिया : शेतकर्‍यांना दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी राज्य शासनाशी पाठपुरावा केला. दरम्यान राज्य शासनाने दिवाळी सणापूर्वी धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पुर्ती व्हावी, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा कायम ठेवला. यामुळे येत्या ३० ऑक्टोबरपासून जिल्ह्यात धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले आहे. प्राप्त निर्देशानुसार मार्वेâटिंग फेडरेशनचे १०७ तर आदिवासी विकास महामंडळाचे ४४ केंद्र सुरू होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

शेतकर्‍यांच्या अडी अडचणी व समस्यांच्या वेळी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्या मार्गी लावण्याचे काम खा.प्रफुल पटेल करतात. या शृंखलेत शेतकर्‍यांना हमीभाव, बोनस, नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम खर्‍या अर्थाने प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने झाले. कोरोना संसर्गाच्या काळातही शेतकर्‍यांचे थकलेले चुकारे आणि बोनस मिळवून देण्यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यानंतर यंदाच्या हंगामापासून अपेक्षा असलेल्या शेतकर्‍यांची दिवाळी आनंदात जावी, या अनुसंगाने खा.प्रफुल पटेल यांनी दिवाळीपूर्वी धानखरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याशी पाठपुरावा केला. दरम्यान राज्य शासनाने दिवाळीपूर्वी धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे सुचना जिल्हा यंत्रणेला दिल्या होत्या.

यानुरूप खा.प्रफुल पटेल यांनी शेतकर्‍यांनाही दिवाळीपूर्वी धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनपूर्तीसाठी त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला. परिणामी जिल्हा प्रशासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन प्रमुख संस्थाच्या अनुक्रमे १०७ व ४४ धानखरेदी केंद्रांना मंजूरी प्रदान करीत येत्या ३० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सर्वच केंद्रात ३० ऑक्टोबरपासून आधारभूत किंमतीमध्ये धानखरेदी करण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच खा.प्रफुल पटेल यांचे आभार मानले जात आहे.

आविमचे मंजूर केलेले धानखरेदी केंद्र

देवरी तालुक्यातील देवरी, आंभोरा, चिचगड, घोनाडी, चिचेवाडा, बोरगाव, परसोडी, डवकी, भर्रेगाव, मुरदोली, पिंडकेपार, गणुटोला, धमदीटोला, लोहारा, सावली, पुराडा, पालांदूर, ककोडी, पलानगाव, आलेवाडा, सालेकसा तालुक्यातील सालेकसा, पिपरिया, साकरीटोला, बिजेपार, लोहारा, गोर्रे, मक्काटोला, दर्रेकसा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव, केशोरी, इळदा, बाराभाटी, धाबेपवनी, पांढरवानी. सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी, चिखली, कोहमारा, सडक अर्जुनी, परसोडी, खजरी, डव्वा व दल्ली, डोंगरगाव, कोयलारी.
मार्वेâटिंग फेडरेशनचे मंजूर केलेले धानखरेदी केंद्र
गोंदिया तालुक्यातील कटंगीकला, रतनारा, गिरोला, अदासी, काटी, दासगाव, टेमनी, गोंदिया, खातिया, परसवाडा, मुंडीपार, आसोली, कोचेवाही, कामठा, नवेगाव, मजितपूर, रावणवाडी, पोवारीटोला, फुलचूर, छिपीया, चुटिया, कोरणी, धापेवाडा, डोंगरगाव, नंगपुर्रा, पांजरा, सावरी, चुलोद, गुदमा, मुरदाडा. तिरोडा तालुक्यातील वडेगाव, बाघोली, भिवापूर, तिरोडा, ठाणेगाव, मुंडीकोटा, चिखली, खैरबोडी, चुरडी, परसवाडा, नवेझरी, चिरेखनी, पांजरा, विहीरगाव, तिरोडा, कवलेवाडा, बेरडीपार, मरारटोला, खुर्शिपार, खमारी, बोदलकसा, केसलवाडा, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, कालीमाटी, तिमेझरी, गणखैरा, तेढा, मोहगाव तिल्ली, चोपा, कुर्‍हाडी, कलेवाडा, दवडीपार, गोंदेखारी, सर्वाटोला, चिचगाव, मोहाडी, गिधाडी, हिरडामाली, आमगाव तालुक्यातील आमगाव, कालीमाटी, गोरठा, कट्टीपार, तिगाव, अंजोरा, वळद, सुपलीपार, रिसामा, टेकरी/कालीमाती, सालेकसा तालुक्यातील सालेकसा, कोटजांभुरा, महाराजीटोला, कुणबीटोला, गिरोला, साकरीटोला, लिंबा, खेडेपार, लटोरी, घोन्सी, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, बाम्हणी, हेटी, मुरपार, धानोरी, पांढरी, मुंडीपार, पांढरी, हरदोली, अर्जुनी मोगाव तालुक्यातील अर्जुनी मोरगाव १, अर्जुनी मोरगाव २, अर्जुनी मोरगाव ३, नवेगावबांध, भिवखिडकी, महागाव, वडेगाव रेल्वे, धाबेटेकडी, बाक्टी व बोंडगावदेवी या केंद्रांचा समावेश आहे.

Related posts