माजी पालकमंत्री डॉ.फुके यांचे प्रयत्न.. जिल्ह्यातील कृषी पंपधारकांना मोठी दिलासा, आता 8 तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा

1,913 Views  गोंदिया. (०३ जानेवारी) राज्याचे माजी मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यात ग्रामीण भागातील शेतकरी संघटनांनी श्री.फुके यांची भेट घेऊन गोंदिया जिल्ह्यातील धान पिकाच्या उत्पादनाबाबत चर्चा केली व कृषिपंप धारक शेतकऱ्यांना यापासून आर्थिक संकटापासून वाचवण्यासाठी 8 तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाची दखल घेत माजी पालकमंत्री डॉ.फुके यांनी राज्याच्या ऊर्जा व उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करून आज 3 फेब्रुवारी रोजी राज्याच्या शेवटच्या टोकावरील नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्याच्या धर्तीवर, कृषी पंपासाठी 8 तासांऐवजी 12 तास…

Read More

जनता दरबारातून मंत्रालयापर्यंत पोहोचला, आशा गट प्रवर्तकांच्या मानधनवाढीचा मुद्दा, लवकरच निघणार जीआर – डॉ.फुके

723 Views  भंडारा/गोंदिया. (31 जाने.) भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी २९ जानेवारी रोजी लाखनी येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात आशा गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ झाल्याची बाब समोर आली होती. शासनाने मानधन 6200 रुपयांवरून 10 हजार रुपये करण्याचे आदेश दिले होते, तरीही दीड महिना उलटून गेला तरी शासनाने शासन निर्णय जारी केला नसल्याचे आशा समूह प्रवर्तकांनी सांगितले. याबाबत आशा गट प्रवर्तक महिलांची तक्रार ऐकून माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी त्यांना धीर दिला व आज ३१ जानेवारी रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासमवेत मुंबई दरबारात बैठक घेतली.…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया शहराध्यक्ष पदी नानू मुदलियार यांची नियुक्ती

787 Views  गोंदिया। खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करणे, पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया शहर अध्यक्ष पदी श्री नानू मुदलियार यांची नियुक्ती करण्यात आली. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते एन एम डी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी श्री नानू मुदलियार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. खा. श्री प्रफुल पटेल यांचे श्री मुदलियार हे निष्ठावंत कार्यकर्ते असून मागील ३० वर्षांपासून पक्षाचे काम करीत आहेत. श्री मुदलियार २…

Read More

पवनी: गावाचा विकास हेच माझे ध्येय – डॉ.परिणय फुके

841 Viewsपवनीतील अनेक गावात विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.. पवनी/भंडारा. गावातील मंदिरे, बौद्ध विहार, ग्रामपंचायत संकुल व रस्त्यालगतचे परिसर आकर्षक व सुंदर बनविण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये  पेव्हिंग ब्लॉक व विविध विकास कामांचे भूमिपूजन आज १० जानेवारी रोजी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे हस्ते संपन्न झाले. या कामांच्या भूमिपूजनप्रसंगी श्री.फुके म्हणाले की,  गावातील मंदिर, बौद्ध विहार संकुलासह गावाचे सुशोभीकरण केल्यास एक उत्साहाचे वातावरण निर्माण होईल व  गावात स्वच्छता व आकर्षकता निर्माण होईल. परिणय फुके म्हणाले, या धार्मिक अनुष्ठाना सोबतच संपूर्ण गावाचा विकास करण्याचा माझे प्रयत्न आहे. रस्ते पक्के झाले…

Read More

आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने अखेर 243 रजेगांव-काटी उपसासिंचन प्रकल्पग्रस्तानां मिळाला न्याय, १५ वर्ष जुने भूभाड्याचे धनादेश अखेर वितरित

946 Views  प्रतिनिधी / गोंदिया “शेतकऱ्यांच्या शेतातील एका काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये” असे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मावळ्यांना शिकवण दिली होती. इथे तर शेतकऱ्यांची शेतजमीन कलाव्यामध्ये गेली आणि त्याच कित्तेक वर्ष मोबदला सुद्धा मिळाला नाही. हा शेतकऱ्यांवरील अन्याय आपल्या महाराष्ट्रात होवू देणार नाही. ही महाराष्ट्राची भूमी आहे यात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल आणि न्याय मिळवून दिला जाईल असे प्रण घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. तालुक्यातील अनेक गावांना शेतीसाठी पाणी पुरविणाऱ्या रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेमुळे मुरपार, मरारटोला, सिरपूर,…

Read More