राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया शहराध्यक्ष पदी नानू मुदलियार यांची नियुक्ती

272 Views

 

गोंदिया। खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करणे, पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया शहर अध्यक्ष पदी श्री नानू मुदलियार यांची नियुक्ती करण्यात आली. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते एन एम डी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी श्री नानू मुदलियार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. खा. श्री प्रफुल पटेल यांचे श्री मुदलियार हे निष्ठावंत कार्यकर्ते असून मागील ३० वर्षांपासून पक्षाचे काम करीत आहेत. श्री मुदलियार २ वेळा गोंदिया नगर परिषदेचे नगरसेवक राहिले आहेत व त्यांची पत्नी सुद्धा १ वेळा नगरसेविका म्हणून कार्य केले आहे. त्यांची सामाजिक कार्यात रुची असून नेहमी ते समाज कार्य करण्यात अग्रेसर असतात. श्री मुदलियार यांच्या नियुक्ती बद्दल गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिंनदन केले.

Related posts