गोंदियासह पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

1,944 Views          मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे.  मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read More

केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते पोहोचले डॉ.फुके यांच्या लाखनी निवासस्थानी, कमळ फुलवून दिला ‘हर घर कमल’चा नारा…

797 Views  भंडारा/गोंदिया. केंद्रीय ग्रामविकास व पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी येथील निवासस्थानी भेट दिली. गोंदिया जिल्ह्यातील सड़कअर्जुनी येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री श्री कुलस्ते डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी निवासस्थानी पोहोचले. डॉ.परिणय फुके यांनी केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांचे स्वागत, अभिवादन व सत्कार करून त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. या बैठकीत श्री.कुलस्ते यांनी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपने सुरू केलेल्या ‘हर घर कमल‘ अभियानाची माहिती घेतली व डॉ.परिणय फुके यांच्या निवासस्थानी कमळ फुलवून…

Read More

कोरोना संकटाच्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व इतर नुकसानीसाठी शासनाने केली मदत जाहीर…

1,392 Views भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ५ कोटींची मदत, सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी सर्वच दृष्टिकोनातून महत्त्वाचे -डॉ. फुके भंडारा/गोंदिया. (२२ फेब्रु.) 2020 ते 2022 या कोरोना संकटाच्या काळात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या संकटाच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन, मासेमारी व्यवसाय, घरे, पिकांसह अन्य नुकसानीचा पंचनामा करून विभागीय स्तरावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र नुकसानीची भरपाई त्या काळात देण्यात आली नाही. याप्रकरणी राज्याचे शेतकरी हितैषी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण राज्यातील आपत्तीग्रस्त…

Read More

पक्ष संघटनाच्या मजबुतीसाठी महिलांचा बरोबरीचा सहभाग आवश्यक – राजेंद्र जैन

680 Views  गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबुत करायचे असेल तर प्रत्येक बूथ कमेटी मध्ये महिलांचा सहभाग बरोबरीचा असला पाहिजे, महिला कार्यकारणी व संगठन मध्ये उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करतांना श्री राजेंद्र जैन बोलत होते.आज राष्ट्रवादी कांग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे तालुका महिला पक्ष पदाधिकारी व कार्यकारिणीची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जि.प. सभापती सौ पूजा अखिलेश सेठ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली. यावेळी खा.श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदिया तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबुत…

Read More

गोंदिया: 26 ला PM मोदी यांच्या हस्ते चुलोद रेल उड़ान पुलाच्या डिजिटल ऑनलाइन पद्धतीने शिलाण्यास..

2,012 Views    गोंदिया(ता.20) रेल्वे गाड्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे नागरिकांना तासंतास रेल्वे गेटवर थांबून राहावे लागत असते. त्यामूळे नागरिकांना खूप त्रास होऊन त्यांचा वेळ वाया जात असतो.हीच अडचण लक्षात घेऊन रेल्वे विभागाने “अमृत भारत” योजनेअंतर्गत गोंदिया तालुक्यातील चुलोद रेल्वे गेट वर उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतला असून येणाऱ्या सोमवारी (ता.26)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल ऑनलाइन पद्धतीने शिलाण्यास सोहळा होणार आहे. सदर कार्यक्रमाचे लाईव्ह आयोजन चुलोद रेल्वे गेट परिसरात करण्यात आले असून सदर कार्यक्रमास खासदार सुनिल मेंढे,आमदार विनोद अग्रवाल व इत्तर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने…

Read More