केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते पोहोचले डॉ.फुके यांच्या लाखनी निवासस्थानी, कमळ फुलवून दिला ‘हर घर कमल’चा नारा…

294 Views

 

भंडारा/गोंदिया.
केंद्रीय ग्रामविकास व पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी येथील निवासस्थानी भेट दिली.

गोंदिया जिल्ह्यातील सड़कअर्जुनी येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री श्री कुलस्ते डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी निवासस्थानी पोहोचले. डॉ.परिणय फुके यांनी केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांचे स्वागत, अभिवादन व सत्कार करून त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली.

या बैठकीत श्री.कुलस्ते यांनी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपने सुरू केलेल्या ‘हर घर कमल‘ अभियानाची माहिती घेतली व डॉ.परिणय फुके यांच्या निवासस्थानी कमळ फुलवून ही मोहीम अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.

केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, भाजपने आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचारमुक्त शासन दिले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचून सभासदत्व अभियानाचा प्रचार करून प्रत्येक घरात कमळ फुलवायचे आहे.

या दरम्यान विदर्भ संघटन मंत्री श्री उपेंद्र कोठेकर सर, प्रदेश उपाध्यक्ष श्री संजय भेंडे जी, खासदार श्री सुनील मेंढे जी, आमदार तथा क्लस्टर प्रमुख श्री प्रवीण दटके जी, श्री हेमंतभाऊ पटले जी उपस्थित होते.

Related posts