2,187 Views
गोंदिया,दि.26 : जिल्ह्यात 27 एप्रिल ते 11 मे 2023 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व 5 मे रोजी बुध्द पौर्णिमा असे सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक 27 एप्रिल पासून ते 11 मे 2023 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.