राजकारणा सोबतच समाजकारण हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश – माजी आमदार राजेंद्र जैन

245 Views

 

राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे पक्षाचा २४ वा वर्धापन दिन मोठया थाटात संपन्न

प्रतिनिधि। (10जून)

गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सौ सुप्रियाताई सुळे व खासदार श्री प्रफुल पटेलजी यांची निवड झाल्याबद्दल गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणावर काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करणारा पक्ष आहे. कितीही कठीण प्रसंग आले तरी जनता, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहली त्यामुळेच आज पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा करीत आहोत असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली गोंदिया येथे ध्वजारोहण कार्यक्रम माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, श्री विनोद हरिणखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.

गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला खासदार श्री प्रफुल पटेल साहेब यांच्या नेतृत्वावर विस्वास आहे. हा पक्ष शेतकरी शेतमजूर यांचा असून श्री प्रफुल पटेलजी यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले आहे. पक्षाचा वर्धापन दिन साजरा करतांना सर्वांनी प्रण घ्यावा कि पक्ष वाढीसाठी बूथ स्तरावर संघटन मजबूत करावे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांनी केले.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, विनोद हरिणखेडे, सौ राजलक्ष्मी तूरकर, प्रभाकर दोनोडे, केतन तुरकर, विशाल शेंडे, रफीक खान, सौ पूजा अखिलेश सेठ, अशोक सहारे, मनोहर वालदे, श्रीमती डॉ माधुरी नासरे, श्रीमती सुशीला भालेराव, ऍड वैशाली जाधव, विनीत सहारे, सौ अश्विनी पटले, निरज उपवंशी, सौ सरला चिखलोंडे, शंकरलाल टेंभरे, सौ आशाताई पाटील, श्रीमती कुंदा दोनोडे, श्रीमती पुस्पलता माने, श्रीमती लता रहांगडाले, श्रीमती मानवती बैस, भाविका नागपुरे, चेतना पराते, केवल बघेले, घनश्याम मस्करे, राजू एन जैन, अखिलेश सेठ, मोहन पटले, पियुष झा, रवी मुंदडा, भगत ठकरानी, नितिन टेभरे, चंद्रकुमार चुटे, इकबाल सय्यद, लीकेश चिखलोंडे, आनंद ठाकूर, योगेश बनसोड, दीपक कनोजे, चंदन गजभिये, सुनील पटले, शैलेश वासनिक, सोनू राय, नागो बन्सोड, नागरतन बन्सोड, पंकज चौधरी, पिंटू बनकर, प्रतीक पारधी, राहुल वालदे, युनुस शेख, हरगोविंद चौरासिया, श्याम चौरे, करण टेकाम, लखन बहेलिया, रमण उके, हरबक्ष गुरनानी, कपिल बावणथळे, कुणाल बावणथळे, आरजू मेश्राम, संदीप पटले, हरी आसवानी, घनेश्वर तीरेले,नरहरप्रसाद मस्करे, दिलीप डोंगरे, कान्हा बघेले, संजीव बापट, राजू येडे, सतीश कोल्हे, बबन मेश्राम, दिलिप पाटील, राजेश नागपुरे, रौनक ठाकूर, निखिल बन्सोड, रोहित मेंढे, अमित बडोले, आर्यन कुथे, निखिता दख्खनवार, कमलेश्वरी रहांगडाले, मनीषा कटरे, चांदणी हाडगे, आरती मौजे, माधुरी कळसर्पे, ख़ुशी चौधरी, नेहा लिल्हारे, अजाबराव रहांगडाले, योगेश डोये, प्रकाश नेवारे, प्रकाश बरय्या, दीपक गायधने, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम सहित कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts