खासदार प्रफुल पटेल यांनी केले कु. नंदिनी चे अभिनंदन व यशाबद्दल कौतुक

458 Views

 

भंडारा। नागपूर बोर्डाच्या १२ वी वाणिज्य शाखेच्या परिक्षेत कु. नंदिनी संजय साठवणे हिने ९९.५० टक्के गुण प्राप्त करून नागपूर बोर्डात प्रथम येण्याचा मान पटकाविला व भंडारा शहराचे नावलौकिक झाले. त्याबद्दल राज्यसभा खासदार श्री प्रफुल पटेलजी यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून तिचे अभिनंदन व कौतुक केले.

कु.नंदिनी ही नुतन कन्या शाळा भंडारा येथे शिकत आहे. हिचे वडील श्री. संजय साठवणे हे एका खाजगी शाळेत बस ड्रायव्हर आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही अश्या परिस्थितीतून मार्ग काढूत यश प्राप्त केले त्याबद्दल श्री प्रफुल पटेलजी यांनी पुष्पगुच्छ देवून तिचे स्वागत केले व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या।

या सत्कार प्रसंगी आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे, प्रदेश महासचिव श्री धनंजय दलाल, श्री देवचंद ठाकरे, श्री राजू साठवणे, रत्नमाला साठवणे, श्री बाळा (शेखर) गभणे, श्री प्रविण साठवणे व प्रमुख राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts