गोंदिया: सराईत गुन्हेगारानां 3 महिन्या पर्यंत गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्ह्याबाहेर हद्दपार. 

500 Views
 प्रतिनिधि। 23 मे
गोंदिया। पोलीस ठाणे रामनगर परिसरातील मौजा वॉर्ड क्र. 3 कुडवा, येथील सराईत गुन्हेगार जाबदेणार – संदेश मधुकर खोब्रागडे याचेविरुद्ध पोलीस ठाणे रामनगर येथे खून, खूनाचा प्रयत्न, विनयभंग, बलात्कार, चोरी, अवैध दारू विक्री, शरीरा विरूद्धचे गुन्हे अश्या विवीध प्रकारचे 11 गुन्हे दाखल असून सराईत गुन्हेगार हा सवयीचा मगरुर, व धाडसी प्रवृत्ती चा आहे. याचे कृतीमुळे  रामनगर, कुडवां परीसरातील महिला, मुली व सर्वसामान्य नागरिकांचे मनात दहशत निर्माण झालेली असून लोकांचे मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याने सर्व साधारण व्यक्ती त्याचे विरुद्ध उघड साक्ष देण्यास येत नाही.
पोलिसांनी त्याचेविरुद्ध वारंवार कारवाई करून सुध्दा त्याचेत सुधारणा झालेली नाही. सदर गुन्हेगाराच्या कृतीमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने  त्याचे विरूद्ध पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे रामनगर यांनी त्यास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करणे करीता कलम 56 (1),(अ),(ब)(महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचे कडे मंजुरीस्तव सादर करण्यात आला होता.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोंदिया यांचे आदेशानुसार श्री. सुनील ताजने, उपविभागीय पोलिस अधिकारी, गोंदिया यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून सदर गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती.
या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी  तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया- पर्वणी पाटील, यांनी विविध प्रकारचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार संदेश मधुकर खोब्रागडे रा. वॉर्ड क्र. 3 कुडवा  यास गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्ह्याचे बाहेर 3 महिन्या पर्यंत गोंदिया जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबत चे आदेश दि.19/05/20 23 ला पारीत केले आहे .
सदर सराईत गुन्हेगारास हद्दपार आदेशानुसार गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोंदिया यांनी केलेल्या हद्दपार कारवाई मुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून रामनगर, मौजा कुडवा, गोंदिया शहरातील नागरिकांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कारवाई निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, अशोक बनकर, अपर पोलिस अधीक्षक गोंदिया, कॅम्प देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यापुढेही पोलीस अधिक्षक गोंदिया, यांचे मार्गदर्शनात अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
अवैध कृत्य करणा-या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून तसेच अवैध धंदयापासून परावृत्त होवून ईतर रोजगाराकडे वळण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.

Related posts