चक्रीवादळसह अवकाळी पाऊस व गारपीट पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरील आर्थिक सहाय्य देण्यात यावे :-आमदार राजु कारेमोरे

322 Views

 

प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने

तुमसर। जिल्हाधिकारी भंडारा यांना उपरोक्त विषयान्वये  आमदार राजू कारेमोरे द्वारे कळविण्यात आले की, तुमसर मतदार संघातील मोहाडी तालुक्यात दि 18.5.2023ला अचानक जोरदार चक्रीवादाळासह अवकाळी पाऊस व गारपीट पडल्यामुळे धान पीक, भाजीपाला, फळबाग, आंबे,टरबूज, डांगरे इत्यादीची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून तालुक्यातील काही ठिकाणी झाडे पडले.

तसेच काही लोकांच्या घराचे टीनाचे पत्रे, कवेलू, व छत उडाल्याने अनेक कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर आले आहेत. तसे वीज कोसळल्याने जनावरे सुद्धा मरण पावल्याने फार मोठे लोकांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी व पिडीत अडचणीत आलेले आहेत.

तरी वरील या बाबीचे गांभीर लक्षात घेता आपण तात्काळ मौका पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावा व नुकसानग्रस्ताना लवकरात लवकर आर्थिक सहाय्य करावे ही विनंती जिल्ह्याधिकारी यांनी आमदार राजू कारेमोरे ने केली आहे.

Related posts