412 Views
गोंदिया,दि.4 : जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगर परिषद प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता पवार बोर्डींग, पुनाटोली, गोंदिया येथे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील संपन्न झालेल्या मोजमाप शिबिरामध्ये पात्र ठरलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य साधने व उपकरणे वितरीत करण्यात येणार आहे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय गणवीर यांनी कळविले आहे.