रामधामचा उत्सवामधून निशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा, 55 जोडपे विवाहबद्ध

138 Views

 

चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधामचा उत्कृष्ठ रामधाम रामधाम तीर्थ मनसर येथे आजपर्यंत 1266 निशुल्क विवाह संपन्न

प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने

तुमसर। चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर), आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रामधाम तीर्थ मनसर येथे आयोजित निशुल्क आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा सुनीलबाबू केदार माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार सावनेर यांचा अध्यक्षतेखाली व चंद्रपालजी चौकसे साहेब (संस्थापक, रामधाम तीर्थ मनसर), सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका, रामधाम तीर्थ मनसर), गौरव चंद्रपालजी चौकसे, सूर्यपालजी चौकसे, महिपालजी चौकसे, सौ. दीपालीताई चौकसे यांचा प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाला.

ग्रा.प. मनसर येथून 55 नवरदेवाची वरात ट्रॅक्टर वर, डी.जे.पड, बँड, आदिवासी नुत्य, व नाचत-गाजत वरात काढण्यात आली व 55 जोडप्यांचे (1 बोद्ध समाज, 10 हिंदू समाज व 44 आदिवासी) समाजाचे विवाह त्याचा रितिरिवाजाप्रमाणे लग्न लावण्यात आले नंतर चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम मनसर तर्फे सर्व नवदाम्पत्यास भेटवस्तू देण्यात आले. चंद्रपालजी चौकसे यांनी आपले प्रस्तावीक भाषणात म्हटले की आईला दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या उत्पनातून कमीत-कमी 10% रकम ही समाजकार्यासाठी खर्च करतो त्यामुळे कोणतेही कर्ज न घेता दरवर्षी ज्यांची लग्न करायची आर्थिक परिस्थिती नाही अशा हजारो जोडप्यांचे येथे निशुल्क लग्न लावण्यात येते विदर्भातील हा एकमेव विवाह सोहळा आहे जो सतत मागील 15 वर्षांपासून सुरु आहे येथे लग्नात आलेल्या हजारो लोकांना स्वादिस्ट भोजन देण्यात येते आता पर्यंत येथे 1266 विवाह संपन्न झालेले आहे* अध्यक्षीय भाषण राज्याचे *माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री. सुनीलबाबू केदार साहेब आमदार सावनेर विधानसभा यांनी आपले भाषणात म्हटले की चंद्रपालजी चौकसे व त्यांचा चौकसे परिवार यांनी आपले जीवनात अखंड समाज सेवेचा जिवंत उदाहरण या विवाह सोहळ्याचा माध्यमातून प्रस्तुत केलेला आहे हे नेहमीच समाजकार्य करतात त्यांचा या कार्याला मी आवर्जून उपस्थित राहतो हे करित असलेल्या कार्याला तोड नाही त्यांचा या कार्याला व वर वधुना मी शुभेच्छा देतो* यावेळी प्रामुख्याने श्री. दयारामजी राय (राष्ट्रीय अध्यक्ष, पंचायती राज सरपंच संघटन), मा.सौ. रश्मिताई बर्वे (माजी अध्यक्षा जी.प. नागपुर), श्री. हुकूमचंदजी आमधरे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई), श्री. संजय पवार (अध्यक्ष, आधार बहुुद्देशिय संस्था नागपुर), श्री. शंकऱजी चहांदे (माजी जी.प. सदस्य नागपुर), मा. करुणाताई भोवते (उपसभापती पं.स. पारशिवनी), सौ. कलाताई ठाकरे (माजी सभापती पं.स. रामटेक तथा सदस्य पं.स. रामटेक), सौ. अस्विताताई बिरणवार सदस्य पं.स. रामटेक), अनिलजी पेंगरेकर, डॉ. वैशालि चोपडे, महेशजी बमनोटे (माजी सभापती), श्री.पी.टी. रघुवंशी, बबलू दुधबर्वे, नासिर शेख, सौ. शोभाताई राऊत (माजी नगराध्यक्ष, रामटेक), श्री. संजयजी बिसमोगरे माजी नगरसेवक रामटेक), सौ. शारदा बर्वे, सौ. विमलताई नागपुरे, सौ. रंजनाताई मस्के, सौ. कांचनमाला माकडे, हेमंत जैन, बन्सीलाल बमनोटे, शरद गुप्ता, हरिभाऊ तुपट, जयराम महाजन, रामदास मथुरे, मोहन कोठेकर, धर्मेंद्र दुपारे, ताराचंद ठाकरे, देवाजी दुधपचारे, शिवराम महाजन, अजय खेडगरकर, रवी बावनकुळे, रितेश कुमरे, प्रीतम मोहबिया, शिवराम वरठी, मोतीराम खंडाते, तुळसीराम वाडीवे, गणाराम धुर्वे, तिरजू नराठी उपस्थित होते

Related posts